विद्यार्थ्यांना दिले जातात स्वअनुभावातून विज्ञानाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:45 AM2019-02-28T11:45:14+5:302019-02-28T11:46:23+5:30
घासकडबी संस्थेची विज्ञानवादी वाटचाल, राष्टÑीय बालविज्ञान परिषदेत वर्चस्व
आॅनलाइन लोकमत
धुळे : शहरातील घासकडबी शैक्षणिक संस्थेची विज्ञानवादी वाटचाल सुरू आहे़ प्रयोगिकांच्या माध्यमातून मुलांना विज्ञानाची ओळख करून देण्याबरोबरच त्यांना वैज्ञानिक शिक्षण देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेतून विद्यार्थ्यांना स्वअनुभवातून विज्ञान अध्ययन केले जाते, अशी माहिती संस्थेचे सचिव एन.एम. जोशी यांनी दिली.
समाजाचा विविध क्षेत्रात सर्वांगिण विकासा व्हावा या उद्देशाने २००२ साली घासकडबी शैक्षणिक संस्थेची स्थापना झाली़
मुबंई, पुणे, नागपूर येथे शासकीय विज्ञान संग्रहालय आहे. संस्थेने २००८ साली जलतज्ज्ञ मुकूंद धाराशिवकर यांच्या संकल्पनेतून धुळ्यात खासगी विज्ञान संग्रहालय स्थापन करीत े स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली़ या विज्ञान संग्रहालयात हसत-खेळत विज्ञान दालने असून, ते पाच विभागात मांडलले आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना प्रयोगशिल शिक्षण घेता यावे, विज्ञानातील बारकाव्यांचा परिचय त्यांना व्हावा यावर विज्ञान प्रयोगिकेने भर दिला़
केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत देखील घासकडबी विज्ञान प्रयोगिकेने स्वत:चा ठसा उमटविला़
गेल्या १० वर्षात संस्थेच्या १५ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत प्रयोग सादर केले आहेत़ २०१२ साली देशातील ६८८ प्रकल्पांमध्ये २० प्रकल्प सर्वोत्कृष्ट ठरले होते, ज्यात महाराष्ट्रातून केवळ दोन प्रकल्प निवडण्यात आले ते दोन्ही प्रकल्प घासकडबी संस्थेचेच होत हे विशेष. देशबंधू व मंजूगुप्ता फाऊंडेशन व रोटरी क्लबच्या सहकार्याने संस्थेने फिरती विज्ञान प्रयोगशाळा सुरू केली़ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या संकल्पना समजाव्यात,त्यामागचे तत्व, प्रयोग शाळेच्या माध्यमातून समजावे, त्यांना प्रयोग कृती करता यावी तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली.
२०१५ मध्ये सुरू झालेल्या या फिरत्या प्रयोगशाळेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पनांची ओळख व्हावी यासाठी ५९ शाळांमधील १४ हजार ३६४ विद्यार्थ्यांना प्रयोग दाखविण्यात आले.
या संस्थेत तिसरी ते दहावीपर्यंतचे विज्ञार्थी वैज्ञानिक शिक्षण घेत असून त्यांच्यासाठी घासकडबी प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते़ विज्ञान क्षेत्रात योगदान देणाऱ्या या संस्थेची वाटचाल धुळे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे़