विद्यार्थ्यांना दिले जाते आॅनलाइन शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:31 PM2020-04-14T22:31:30+5:302020-04-14T22:31:52+5:30
देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उपक्रम, राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करता येणार
धुळे : करोना च्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शैक्षणिक संस्था बंद असल्याने २०१९-२० या शैक्षणिक वषार्तील शेवटच्या काही दिवसांचे अध्ययनाचे काम खंडित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाने आॅनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षातील राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.
अभियांत्रिकीचे जवळपास सर्वच विद्यार्थी सोशल मिडीया वापरत असल्याने व विद्यार्थ्यांचे वर्गनिहाय वॉटसअॅप गृप आधीच तयार केलेले असल्याने संबधित विषय शिक्षक प्राचार्य व विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना ईमेल, गुगल क्लास रुम, गुगल फॉर्म, वॉटसअॅप आदी संकल्पना वापरुन त्या माध्यमातून व्हॉइसमेसेज, पीपीटी, बहुपर्यायी प्रश्न, क्विझ, प्रश्न संग्रह, विद्यापीठ परिक्षांच्या जुन्या प्रश्न पत्रिका याद्वारे आॅडिओ व्हिज्युअल पध्दतीने विविध विषयांचे शिक्षण देत असून विद्यार्थी विद्याथीर्नी घरबसल्या अध्ययन करीत आहेत. तंत्र शिक्षण संचालक डॉ अभय वाघ यांच्या सूचनेनुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. एस. एल. नलबलवार यांनी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी वॉटसअॅप गृप मधे संपर्क साधून व झूम अॅप द्वारे मिटींगमध्ये निर्णय घेऊन यासंबंधी धोरण निश्चित करुन लगेचच कार्यवाही सुरू केली. या महिन्या अखेर उर्वरित अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करण्याचे महाविद्यालयाने नियोजन केले आहे. महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष देवरे व प्राचार्य डॉ हितेंद्र पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. डी. सूर्यवंशी, प्रा. डॉ.एस. एन. जैन, प्रा. डॉ. पी. एस. पाटील, प्रा. डॉ. एस. के. दुबे, प्रा. के. एन. पवार, प्रा. भालचंद्र मांडरे, यासाठी प्रयत्नशील आहेत.