विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वाटपास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:40 PM2019-02-23T12:40:27+5:302019-02-23T12:41:03+5:30
महानगरपालिका : दोन दिवसात शहरातील १ ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार गोळ्या
धुळे : राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेनिमित्त महानगरपालिकेतर्फे जंतनाशक गोळ्या वाटपास सुरूवात झालेली आहे. दोन दिवसात १ ते १९ वर्षे वयोगटातील शहरातील १ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़
जंतनाशक दिनाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी शहरातील जयहिंंद इंग्लिश मेडीयम स्कूल येथे महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपमहापौर कल्याणी अंपळकर, विरोधी पक्षनेते साबिरशेठ भंगारवाला, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, उपायुक्त शांताराम गोसावी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ़ बी़ बी़ पाटील उपस्थित होते़
शहरातील एकूण १ लाख ३३ हजार ०४८ विद्यार्थ्यांना गोळ्या वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
यात १ ते ५ वर्षे वयोगटात ६ हजार ४५८ मुले, ६ हजार ६०५ मुली, ६ ते १० वर्षे वयोगटात १४ हजार ६४५ मुले, १४ हजार ३२८ मुली, १० ते १८ वर्षे वयोगटात २९ हजार २७७ मुले, २९ हजार ९६२ मुली, महाविद्यालयीन ४ हजार ७२२ मुले, ५ हजार ४५९ मुली, तांत्रिक शिक्षण घेणारी १ हजार ८६३ मुले, १ हजार ७१५ मुली आणि इतर ९ हजार ३३५ मुले व ८ हजार ६७९ मुलांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळत आहे.
लाभार्थ्यांनी गोळ्या वाटपाच्या दिवशी शाळेत, अंगणवाडीत किंवा मनपाच्या दवाखान्यांमध्ये लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे़