विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत व्यक्त केली कृतज्ञता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:24 PM2019-09-09T12:24:56+5:302019-09-09T12:25:16+5:30
जिल्हाभरात शिक्षक दिन उत्साहात : शाळा, महाविद्यालयात विविध उपक्रम, गुलाबपुष्प देऊन गुरुंप्रति आदरभाव
धुळे : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन आदर व्यक्त केला.
डॉ.विजयराव रंधे ज्युनियर कॉलेज
शिरपूर- येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ.विजयराव रंधे ज्युनियर कॉलेज येथे शिक्षक दिवस व विश्वासराव रंधे यांचा स्मृती दिवस साजरा करण्यात आला़ विद्यालयातील प्राथमिक ते ज्युनियर कॉलेजच्या ६१ विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली. मुख्याध्यापिकांची भूमिका साकारणाºया भूमिका चारण या विद्यार्थिनींचा आशा रंधे यांनी विशेष सत्कार केला. सर्व विद्यार्थी शिक्षकांना गुलाबपुष्प व पेन भेट देऊन गौरविण्यात आले. समन्वयक प्रा़जी़व्ही़ पाटील व रमाकांती विश्वकर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच पियुष पाटील, माधुरी तिरमले, गौरव साळुंखे, दिशा राजपूत, कनक पाटील यांनी डॉ़राधाकृष्णन व शिक्षकांप्रति ऋण व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापिका कामिनी पाटील, सारिका ततार, प्रमोद पाटील, पूजा बाफना, ज्योती पवार, गणेश भामरे, भावेश गिरासे, मनीषा लोखंडे, स्वाती चव्हाण, मनीषा पाटील, माधुरी पाटील, प्रशांत बोरसे, समाधान राजपूत उपस्थित होते. सुत्रसंचालन गायत्री चौधरी, तुषार तारे तर आभार नीलिमा पाटील यांनी केले.
एस.आर.बी. इंटरनॅशनल स्कूल
दहिवद- येथील एस.आर.बी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम बाविस्कर, उपाध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर, चेअरमन डॉ़धीरज बाविस्कर, मानसी बाविस्कर, सीईओ सविता तिवारी, प्रशासकीय अधिकारी श्रीराम कुºहेकर आदी उपस्थित होते. इ. ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनी शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संचालक मंडळातील सदस्यांची भुमिका बजावली. तसेच कृतिका पाटील, पार्थ बाविस्कर, तेजस्विनी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शिक्षक अमोल सोनार, आभीषकुमार, मोना चव्हाण यांनी शिक्षक दिनाचे महत्व सांगितले़ सुत्रसंचालन योगेश पाटील, अमोल सोनार, सृष्टी राजपुत, श्रुती कुºर्हेकर, सायली गरुड यांनी केले़
अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय
शिरपूर- येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेच्या शिवराम भिमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थी शिक्षक मिलिंद गोपाल ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आय.पी. चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. एस.बी. बडगुजर व के.बी. लोहार यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन सुजित संजय ईशी तर आभार प्रदर्शन तेजस्विनी संजय बागुल हिने केले.
आर.सी़ पटेल महाविद्यालय
शिरपूर- येथील आर.सी़पटेल कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका साकारली. प्राचार्यांची भूमिका अनुराधा मिश्रा हिने केली़ पृथ्वीराज चव्हाण, दर्शन साळुंखे, गायत्री वाणी, हिमांशू मराठे, जयेश चौधरी, स्वामी पाटील, साजन पावरा, हेमांगी जाधव यांनी शिक्षकांची भूमिका साकारली. यावेळी प्राचार्य पी़व्ही़ पाटील, प्रा.एस.आर. महाजन, प्रा.पी.टी. चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना युनिट प्रमुख प्रा.बी.एन. अहिरे , प्रा.एस.आर. पाटील, प्रा.एस.आर. देसले, प्रा.जी.आर. मराठे, जे.जे. माळी, आर.ए. जोशी, स.बी. हूलसुरे, बी.आर. पाटील, के.एम. राजपूत उपस्थित होते. सुत्रसंचालन, आभार प्रदर्शन अनुष्का भोंगे व मिनल जाधव यांनी केले.
पिंपळादेवी प्राथमिक विद्यामंदिर
धुळे- मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षकदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय ठाकरे होते. मुख्याध्यापकांची भूमिका साकारणाºया मानसी संतोष कोकणे हिच्याहस्ते डॉ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपशिक्षक विलास निकम, इंदिरा भोसले, विद्यार्थिनी भूमिका सुनिल गोसावी यांनी मनोगत केले. विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. कमलाकर बच्छाव, सुजाता आवाळे, मनिषा पाटील यांनी विद्यार्थ्यांना पेन भेट दिले. सूत्रसंचालन नंदराज सोनवणे यांनी केले.
खर्दे येथे विद्यार्थी शिक्षकांना पारितोषिक
उंटावद- खर्दे बु. येथील आर.सी. पटेल प्राथमिक शाळेत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रदिप गहिवरे होते. यावेळी मुख्याध्यापकांसह छाया पाटील, सुशीला मराठे, वसंत भामरे, प्रशांत चौधरी, अनिल माळी, विजय गुजर, शरद पाटील यांचा गुलाबपुष्प, श्रीफळ व पेन देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त मुख्याध्यापकांची भूमिका गौरव भगवानसिंग गिरासे याने साकारली. इयत्ता दुसरी ते चौथीच्या ३० विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या भूमिकेबद्दल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे मुख्य वित्त अधिकारी नाटूसिंग गिरासे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन उपशिक्षक प्रशांत चौधरी यांनी केले. कार्यक्रमासाठी सुशीला मराठे, वसंत भामरे, छाया पाटील, विजय गुजर, शरद पाटील यांनी परिश्रम घेतले.