विद्यार्थ्यांनी दहिहंडीच्या उत्सवातून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 10:52 PM2019-08-27T22:52:01+5:302019-08-27T22:52:18+5:30

कोकणगाव शाळेत कार्यक्रम : विद्यार्थ्यांनी टिपरीने फोडली दहिहंडी

Students give message of tree conservation from Dahihandi festival | विद्यार्थ्यांनी दहिहंडीच्या उत्सवातून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश

दहिहंडी फोडतांना विद्यार्थी

Next

पिंपळनेर : येथुन जवळच असलेल्या कोकणगाव  येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत  नुकताच दहिहंडीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी  वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. 
   वृक्ष आपले मित्र,  झाडे लावा झाडे जगवा,  वृक्ष संवर्धन काळाची गरज,  अशा घोषवाक्यांद्वारे  प्रबोधन करण्यात आले. निसर्ग घटकांचा वापर करून शाळेतील 'उपक्रमशील शिक्षक  श्रीकांत दिलीप अहिरे यांच्या संकल्पनेतून पारंपारीक वेशभूषेत नटलेल्या  बाळकृष्णाने  वृक्ष प्रेमाचा  संदेश आपल्या वेशभूषेतून  दिला.   गोपाळकाला उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे दहीहंडी. सर्व विद्यार्थी बाळगोपाळांनी टिपरी नृत्यातून दहीहंडी फोडली. 
 कृष्णाची वेशभूषा मनोहर देविदास चौरे याने तर  राधाची वेशभूषा वर्षा छोटू माळी हिने साकारली होती.   यावेळी शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पवार, उपाध्यक्ष दीपक सजन ठाकरे, सदस्य, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक  दिलीप काशिद  यांचेही सहकार्य लाभले.

Web Title: Students give message of tree conservation from Dahihandi festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे