आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधत काढली जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2022 07:43 PM2022-02-28T19:43:39+5:302022-02-28T21:26:31+5:30

गावातील परिसरातील आजूबाजूच्या भागांमध्ये फेकलेल्या प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिकचा कचरा हा विद्यार्थ्यांनी संकलित केला आहे.

Students of Ashram School staged an awareness rally on the occasion of World Science Day | आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधत काढली जनजागृती रॅली

आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधत काढली जनजागृती रॅली

Next

विज्ञान दिवसाचे औचित्य साधत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुळे पर्यावरनाला कशा पद्धतीने हानी पोहोचत आहे, यासाठी प्लास्टिक मुक्त भारत करण्यासाठी जनजागृती रॅली काढून नागरिकांना प्लास्टिक मुळे पर्यावरणाची कशापद्धतीने हानी होत आहे याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत धुळ्यातील वार गावात जन जागृती रॅली काढली. 

गावातील परिसरातील आजूबाजूच्या भागांमध्ये फेकलेल्या प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिकचा कचरा हा विद्यार्थ्यांनी संकलित केला आहे. त्याचबरोबर या प्लास्टिकचा उपयोग हे विद्यार्थी मेडिटेशन रूम बनवण्यासाठी करणार असून या टाकाऊ प्लास्टिकचा चांगल्या पद्धतीने उपयोग या विद्यार्थ्यांकडून केला जाणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

धुळे तालुक्यातील वार या गावातील केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळेच्या या विद्यार्थ्यांनी हा अनोखा उपक्रम आज जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधत राबविला आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्याचे बघायला मिळाले आहे.

Web Title: Students of Ashram School staged an awareness rally on the occasion of World Science Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे