धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे दोन तास ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 03:37 PM2019-01-21T15:37:19+5:302019-01-21T15:39:24+5:30

बंद बस सुरू करण्याची मागणी, निवासी उपजिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

Students protested for two hours in Dhule before District Collector's office | धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे दोन तास ठिय्या आंदोलन

धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे दोन तास ठिय्या आंदोलन

Next
ठळक मुद्देआंदोलनात ५०-६० विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभागघोषणांनी परिसर दणाणलाआंदोलनकर्त्यांनी अधिकाºयांशी केली चर्चा

आॅनलाइन लोकमत
धुळे : बंद असलेली बस तत्काळ सुरू करावी, एस.सी.,एस.टी., ओबीसी विद्यार्थ्यांची शालेय शिष्यवृत्ती तत्काळ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी शिंदखेडा तालुक्यातील साहूर,शेंदवाडे, झोटवाडे, दाऊळ, मंदाणे या गावातील विद्यार्थ्यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. अखेर परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
साहूर परिसरातील शेंदवाडे, झोटवाडे, दाऊळ, मंदाणे या गावांमधील अनेक  विद्यार्थी शिक्षणासाठी दोंडाईचा येथे जातात. मात्र दोंडाईचा बस बंद असल्याने,  विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शालेय शिष्यवृत्तीही वेळेवर  मिळत नसल्याची तक्रार आहे. यापूर्वीही  आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी साहूर ते दोंडाईचा असे १० किलोमीटर पर्यंत  मोर्चा काढून अपर तहसीलदारांना निवेदन दिले. त्यानंतर साहूर (ता. शिंदखेडा) येथील तापी नदीच्या पात्रात उभे राहून जलसमाधी आंदोलन केले. मात्र तरीही त्याची दखल न घेतल्याने, विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
या ठिय्या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केले होते. सुरवातीला विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच ठिय्या मांडला. विद्यार्थी प्रवेशद्वाराजवळच बसल्याने येणाºया- जाणाºयांनाही अडचणी येत होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडला. यावेळी जवळपास ५०-६० शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.
विभागीय वाहतूक अधिकारी दाखल
आंदोलनाची दखल घेत धुळे विभागाचे वाहतूक अधिकारी किशोर महाजन जिल्हाधिकारी कार्यालयात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार अमोल मोरे यांच्याशी आंदोलनकर्त्यांनी चर्चा केली. बस तत्काळ सुरू करावी अशी मागणी केली.
यानंतर परिवहन विभागाचे अधिकारी व आंदोलनकर्ते रस्ता पाहणीसाठी गेले होते. 


 

Web Title: Students protested for two hours in Dhule before District Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.