दोंडाईचा येथे स्टडी रूम, लायब्ररी व हेल्थ चेकअप सेंटरचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 09:37 PM2019-05-06T21:37:33+5:302019-05-06T21:39:02+5:30

मान्यवरांची उपस्थिती : के.एस. परिवाराचे उपक्रम

Study room, library and health check-up center at Dondaicha | दोंडाईचा येथे स्टडी रूम, लायब्ररी व हेल्थ चेकअप सेंटरचे लोकार्पण

dhule

Next


दोंडाईचा : दोंडाईचा परिसरात समाजपयोगी कार्यात भरीव योगदान देणाऱ्या के.एस. परिवारातर्फे गुरूवारी कुमार-खुषी कॉम्प्लेक्स येथे के.एस.स्टडी रूम व लायब्ररी आणि के.एस. हेल्थ चेक अप सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. स्व.काकाजी कांतीलाल जैन यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ हा उपक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी परिवाराच्या लिलावती जैन, काकीजी चंद्र्रावती जैन, अशोक जैन, किशोर जैन, कैलास जैन तसेच हस्ती बँक व्हाईस प्रेसिडेंट पहलाज माखिजा, प्रकाश कुचेरिया, माधव बोधवाणी, डॉ. मंजिरी सोहनी, दिलीप वाघेला, खुर्शिदभाई कादियानी, दिनेश व्होरा, अभय अवाड, चोईथ कुकरेजा, बी.बी. पाटिल, पांडुरंग कागणे, डॉ.पुरूषोत्तम भावसार, डॉ. गणेश खैरनार, डॉ. राजू पाटील, डॉ. अनिल धनगर, डॉ. दीपक परमार व राजू परदेशी हे मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक कैलास जैन यांनी केले. याप्रसंगी त्यांनी, स्व. शांतीलाल जैन व स्व.कांतीलाल जैन यांचे आचार, विचार व त्यांनी मार्गक्रमण केलेल्या वाटेवर चालण्याचा के.एस. परिवाराचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे सांगितले. यानंतर या दोन उपक्रमांचे समाजाकरिता लोकार्पण करण्यात आले.
या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांची पुस्तके विद्यार्थ्यांकरीता उपलब्ध आहेत. येथे साधारणत: ४० विद्यार्थी बसू शकतील. तसेच लहान मुलांमध्ये पुस्तक वाचन वाढावे, यासाठी गोष्टींची पुस्तके आहेत; तर ज्येष्ठांसाठी धार्मिक पुस्तकेही उपलब्ध आहेत. ही योजना नि:शुल्क आहे. तसेच के.एस. हेल्थ चेक अप सेंटर योजनेत दररोज ५ गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या मधील चाचण्या अल्पदरात केल्या जातील. योजनेसाठी साईराज क्लिनिकल लॅबचे सहकार्य मिळत आहे. या योजनेतील अनुभवानुसार नंतर रुग्णांची संख्या वाढवयाचा मानस असल्याचे के.एस. परिवारातर्फे यावेळी सांगण्यात आले.
के.एस.परिवाराने शहरात या दोन समाजपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून, आपल्या पूर्वजांच्या दातृत्वाच्या परंपरेचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न केला आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Study room, library and health check-up center at Dondaicha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे