ग्रामसभेत हवा वृक्षारोपणाचा विषय!
By admin | Published: April 28, 2017 05:51 PM2017-04-28T17:51:48+5:302017-04-28T17:51:48+5:30
जिल्हा परिषद : राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून आदेश जारी, अंमलबजावणीचा अहवालही मागविला
Next
धुळे, दि.28- महाराष्ट्र दिनाचे औचित्यसाधून 1 मे रोजी जिल्ह्यातील सर्व 550 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा भरविण्यात येणार आह़े त्यात अनेक स्थानिक विषय असलेतरी त्यात वृक्षारोपणाचा विषय जरुर घ्यावा़ त्याबाबतीतला अहवाल तातडीने ग्रामविकास विभागाकडे सादर करावा असा आदेश शासनाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आह़े त्यामुळे या विषयाकडे अधिक लक्ष द्या, वस्तुस्थितीचा अहवाल तातडीने द्या अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी सर्व ग्रामपंचायतींना दिलेल्या आहेत़
ग्रामविकास विभागाकडून ग्रामपंचायतींना आदेश
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार आवश्यक असणारे भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के वनाच्छादन निर्माण करुन उष्णतेत होणारी वाढ, दुष्काळ, हवामानातील बदल याची तीव्रता आणि परिणामकारकता कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या प्रयत्नांना मागील वर्षी ग्रामस्थांचा आणि स्थानिक पदाधिका:यांचा प्रतिसाद मिळाला होता़ त्यांच्या पाठींब्यामुळे संपूर्ण राज्यात 2 कोटी 80 लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती़
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतींना सूचना
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व 550 ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत़ त्यात वृक्ष लागवड मोहीमेसंदर्भात विषय घेवून त्यावर चर्चा करावी आणि अंमलबजावणी करण्याबाबत स्पष्ट केलेले आह़े मुंबई ग्रामपंचायत (ग्रामसभेच्या बैठकी) नियम 1959 च्या नियम 3 (1) नुसार प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली सभा ही त्या वर्षीच्या सुरुवातीनंतर दोन महिन्याच्या आत अर्थात 30 मे र्पयत भरविण्याचे सरपंचावर बंधनकारक आह़े त्यास अनुसरुन चालू वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली सभा ही अनिवार्यपणे 1 मे 2017 महाराष्ट्र दिनी आयोजित करण्यात यावी़ या ग्रामसभेत ग्रामपंचायत स्तरावरील विषयांव्यतिरिक्त राज्य शासनाच्या स्तरावरील जे वृक्षारोपणाबाबतचे विषय आहेत, त्यावर चर्चा झाली पाहीजे आणि अंमलबजावणीबाबत धोरण स्पष्ट कराव़े त्यानुसार धोरण आखत त्याबाबत ग्रामसभेत चर्चा करावी अशाही सूचना दिल्या आहेत़