लॉकडाऊनचा असाही परिणाम मद्यविक्रीच्या महसुलात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 10:51 PM2020-09-08T22:51:47+5:302020-09-08T22:52:08+5:30

एप्रिल ते जुलै महिन्यातील स्थिती

Such a lockdown has resulted in a drop in alcohol sales revenue | लॉकडाऊनचा असाही परिणाम मद्यविक्रीच्या महसुलात घट

लॉकडाऊनचा असाही परिणाम मद्यविक्रीच्या महसुलात घट

Next

धुळे : कोरोनाच्या अनुषंगाने सुरुवातीला सर्वत्र लॉकडाऊन होते़ त्यानंतर स्थिती पूर्ववत सुरु झाल्यानंतर अनलॉक करुनही मद्यविक्रीच्या महसुलात वाढ न होता घटच झाली आहे़ एप्रिल ते जुलै महिन्यात देशी, विदेशी, वाईन आणि बिअर अशा चारहीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत महसूल घटला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांनी दिली़
२०१९-२० मध्ये एप्रिल महिन्यात देशी दारुतून २ लाख १५ हजार ५७ रुपये, मे मध्ये २ लाख ६९ हजार ६९० रुपये, जून मध्ये २ लाख ४४ हजार २९९ रुपये, जुलै महिन्यात २ लाख २५ हजार २८९ रुपये असे एकूण ९ लाख ५४ हजार ३३५ रुपयांचा महसूल जमा झाला होता़ विदेशी दारुतून एप्रिल महिन्यात १ लाख २४ हजार २४ रुपये, मे महिन्यात १ लाख ६३ हजार ४६७ रुपये, जून महिन्यात १ लाख ४० हजार ४७२ रुपये, जुलै महिन्यात १ लाख ३७ हजार ४६२ रुपये असे एकूण ५ लाख ६५ हजार ४२५ रुपये महसूल जमा झाला होता़ वाईन दारुतून एप्रिल महिन्यात २ हजार १०७ रुपये, मे महिन्यात २ हजार २६६ रुपये, जून महिन्यात २ हजार ३९० रुपये, जुलै महिन्यात २ हजार १५७ रुपये असे एकूण ८ हजार ९२० रुपये महसूल जमा झाला होता़ तसेच बिअर या प्रकारातून एप्रिल महिन्यात १ लाख ९६ हजार २२२ रुपये, मे महिन्यात २ लाख ७९ हजार ४१२ रुपये, जून महिन्यात २ लाख १८ हजार १५४ रुपये, जुलै महिन्यात १ लाख ४२ हजार १३९ रुपये असे एकूण ८ लाख ३५ हजार ९२७ रुपये महसूल जमा झाला होता़
२०२०-२१ मध्ये एप्रिल महिन्यात सर्वच बंद असल्यामुळे एक रुपयाही महसूल जमा झालेला नव्हता़ त्यानंतर थोडी सूट मिळाल्यामुळे मे महिन्यापासून महसूल जमा होण्यास सुरुवात झाली़ त्यानुसार, देशी दारुतून मे मध्ये १ लाख २६ हजार २९६ रुपये, जून मध्ये १ लाख ५६ हजार ७३७ रुपये, जुलै महिन्यात १ लाख ५७ हजार २१८ रुपये असे एकूण ४ लाख ४० हजार २५१ रुपयांचा महसूल जमा झाला़ विदेशी दारुतून मे महिन्यात ८१ हजार १२९ रुपये, जून महिन्यात १ लाख १२ हजार २८३ रुपये, जुलै महिन्यात १ लाख १६ हजार ८८९ रुपये असे एकूण ३ लाख १० हजार ३०१ रुपये महसूल जमा झाला़ वाईन या दारुतून मे महिन्यात ९४९ रुपये, जून महिन्यात १ हजार ७५२ रुपये, जुलै महिन्यात १ हजार ७९५ रुपये असे एकूण ४ हजार ४९६ रुपये महसूल जमा झाला़ बिअर दारुतून मे महिन्यात १ लाख १७ हजार ४३ रुपये, जून महिन्यात १ लाख ३७ हजार ६१४ रुपये, जुलै महिन्यात १ लाख २२ हजार ९१२ रुपये असे एकूण ३ लाख ७७ हजार ५६९ रुपये महसूल जमा झाला़

Web Title: Such a lockdown has resulted in a drop in alcohol sales revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे