अभियंत्याची अशीही सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 09:13 PM2020-04-23T21:13:15+5:302020-04-23T21:13:35+5:30
मदत वाटप : लॉकडाउनपासुन अखंड सेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जलसंपदा विभागाचे अभियंता कपिल प्रमोद सोनार हे लॉकडाउन सुरू झाल्यापासून आजपर्यंत शेकडो गरजुंना, भिक्षुकांना खिचडी, भाजी पोळीचे दररोज वाटप करत आहेत.
तसेच न चुकता या काळात प्रत्येक शनिवारी व एकादशीच्या दिवशी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येत आहे. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दररोज मसाला चहा, बिस्किट व कांदेपोहे यांचे वाटप प्रतिदिन केले जात आहे़ वाडीभोकर रोड नेहरूनगर परिसरात हातावर पोट असणाºया दिडशे कुटुंबांना दहा दिवस पुरेल एवढा जिवनावश्यक किराणा वाटप करण्यात आलेला आहे. पाचशे पेक्षा अधिक व्यक्तींना मास्क वाटप केले आहे़
त्यांच्या या उपक्रमाला त्यांचे वडील प्रमोद सोनार यांची मोलाची साथ लाभत आहे. तसेच आई मिनाक्षी सोनार व पत्नी कविता सोनार यांचे स्वयंपाक घरात विशेष सहकार्य लाभत आहे.
कपिल सोनार यांच्या कुटुंबाने या कार्यातून आदर्श निर्माण केला आहे़