पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून चक्क फिल्टर प्लान्ट पेटविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2017 01:15 PM2017-06-21T13:15:54+5:302017-06-21T13:15:54+5:30

न्याहळोद येथील घटनेत कथीत प्रियकराचे 12 लाख रुपयांचे नुकसान

Suffer a lot of filtration plants from the suspicion of the character of the wife | पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून चक्क फिल्टर प्लान्ट पेटविला

पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून चक्क फिल्टर प्लान्ट पेटविला

Next

ऑनलाईन लोकमत

न्याहळोद,जि.धुळे, दि.21 : प}ीवर चारित्र्याचा संशयातून न्याहळोद येथे एकाने प}ीच्या कथीत प्रियकराच्या भागीदारीत उभारलेला गावातील खासगी जलशुध्दीकरण प्रकल्प ( अॅक्वा फिल्टर प्लान्ट) मंगळवारी सकाळी आठ वाजता पेट्रोल टाकून पेटवून दिला.  या घटनेत सुमारे 12 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  याप्रकरणी सोनगीर पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 
धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील दोन मित्रांनी गावात खासगी जलशुद्धीकरण  प्रकल्प सुरू केला होता. या दोघा मित्रांपैकी एकाचे गावातील एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते. ही बाब संबंधित महिलेच्या पतीला समजल्यानंतर त्याने  प}ीच्या प्रियकरला सोमवारी सायंकाळी मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. 
फोनवर बोलत असल्याने संशय गडद
संशयित आरोपीची प}ी सोमवारी सायंकाळी एकाशी फोनवर बोलत होती. ती तिच्या प्रियकराशीच बोलत असावी, असा  संशय घेत पतीने  प्रियकराला गावातील बसस्थानाकाजवळ अडवून मारहाण केली. जखमी अवस्थेत त्या प्रियकराला त्याच्या मित्राने उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर संशयित आरोपी व त्याच्या साथीदारांनी प्रियकराच्या घरी जात त्याच्या आईला मारहाण केली. त्यानंतर त्या प्रियकराच्या व्यावसायीक भागीदाराच्या घरी जात प्रियकराला घरात लपवून ठेवल्याच्या समजावरून शिवीगाळ केली. 
दरम्यान, सोमवारी सायंकाळी गावात  प्रियकराला पतीने आपल्या साथीदारांसह मारहाण केल्याचे कळाल्यानंतर ‘ती’ पतीला आणि कोणालाही काही न सांगता  घाबरून घरातून निघून  गेली. ते कळाल्यानंतर तिच्या पतीने गावात ‘त्या’ दोघा मित्रांनी भागीदारात सुरू केलेल्या फिल्टर प्लान्टचे कुलूप तोडून तो प्रकल्प  पेट्रोल टाकून पेटवून दिला.  या घटनेत पाण्याचे जार, अवजारे व इतर साहित्य असे एकूण 12 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. 

Web Title: Suffer a lot of filtration plants from the suspicion of the character of the wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.