धुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया स्त्रोतांमध्ये पुरेसा जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 11:28 AM2018-02-15T11:28:47+5:302018-02-15T11:29:52+5:30
नकाणेत २०१ तर डेडरगाव तलावात ७८ दलघफू पाणी उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहराला पाणीपुरवठा करणाºया जलस्त्रोतांमध्ये पुरेसा जलसाठा शिल्लक असल्याची माहिती मनपा पाणीपुरवठा विभागाने दिली आहे़ नकाणे तलावात २०१ दलघफू जलसाठा असून तापी नदीवरील सुलवाडे बॅरेजमध्ये देखील पुरेसे पाणी उपलब्ध असल्याची माहिती मनपा सुत्रांनी दिली़
शहराच्या ६० टक्के भागाला तापी योजनेवरून पाणीपुरवठा होतो़ तर ४० टक्के भागाला नकाणे तलावावरून पाणीपुरवठा केला जातो़ परंतु फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने उपलब्ध जलसाठा जुन-जुलैपर्यंत पुरविण्याची कसरत पाणीपुरवठा विभागाला करावी लागते़ मात्र सद्यस्थितीत शहराला पाणीपुरवठा करणाºया जलस्त्रोतांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे़ नकाणे तलावात २०१ दलघफू, डेडरगाव तलावात ७८ दलघफू व सुलवाडे बॅरेजमध्ये १०० टक्के जलसाठी उपलब्ध असल्याचे मनपा पाणीपुरवठा विभागप्रमुख चंद्रकांत उगले यांनी सांगितले़ दरम्यान, अक्कलपाडा प्रकल्पातून नुकतेच पांझरा नदीपात्रात २०० दलघफू पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले असून ते धुळयात पोहचल्यानंतर त्यावरून शहराला पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे़ त्यामुळे आठ ते दहा दिवस शहराच्या जलस्त्रोतांमधील पाणीसाठा वाचविला जाणार आहे़