सुगडी वाटपात भ्रष्टाचार
By Admin | Published: September 20, 2015 01:02 AM2015-09-20T01:02:22+5:302015-09-20T01:02:22+5:30
अनिल गोटे : रघुवंशी, शिंदे यांच्यावर आरोप
धुळे : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गर्भवती महिलांना दर्जाहीन सुगडी वाटप करण्यात आली आह़े यात भ्रष्टाचार झाला असून याबाबत केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मेनका गांधी यांच्याकडे तक्रार केली आह़े त्यांनी चौकशीचे आदेश पारित केले असल्याची माहिती आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेतून दिली़ सुगडी वाटपाच्या भ्रष्टाचारात विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किरण शिंदे सामील असल्याचा आरोपही या वेळी केला. गरीब महिलांना गरोदरपणात सकस आहार मिळावा आणि कुपोषित बालक जन्माला येऊ नये यासाठी सुगडी वाटप करण्यात येत़े तसेच मुलांना केंद्राकडून शंभर टक्के अनुदानावर योजना सुरूकेली़ पण, महिला व बालकांच्या पोषण आहाराचे कुपोषण आहारात रूपांतर करून भ्रष्टाचार करण्याचा लाजिरवाणा प्रकार चंद्रकांत रघुवंशी आणि किरण शिंदे यांनी केला असल्याचा आरोप केला आह़े इतक्या निष्ठुरपणे केलेल्या गैरप्रकारांची केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मेनका गांधी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आह़े जनावरेसुद्धा खाणार नाहीत अशी ही सुगडी, यासंबंधीचे छायाचित्र, सीडी आणि अन्य पुरावे असे एकूण 43 पानांचे पुरावे त्यांना सादर केले असल्याचे आमदार गोटे यांनी सांगितल़े विशेष म्हणजे मंत्री मेनका गांधी यांनी ते पाहिले आहेत़ क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सीबीआयच्या संचालकांशी बोलणे करून 1 महिन्याच्या आत प्राथमिक अहवाल सादर करण्यासंबंधीचे आदेश पारित केले आहेत़ निकृष्ट आहार वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांशीही बोललो असल्याचे आमदार गोटे म्हणाले.