अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, शिरपूर तालुक्यातील घटना

By देवेंद्र पाठक | Published: May 8, 2023 06:08 PM2023-05-08T18:08:59+5:302023-05-08T18:09:21+5:30

रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

Suicide of minor girl by hanging, incident in Shirpur taluka | अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, शिरपूर तालुक्यातील घटना

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, शिरपूर तालुक्यातील घटना

googlenewsNext

धुळे :शिरपूर तालुक्यातील जामनपाणी पोस्ट बोराडी येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. सहाबाई निमड्या पावरा असे या मुलीचे नाव आहे.

रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहत्या घरी छताच्या लाकडाला दोरीने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. आत्महत्या केल्याची घटना लक्षात येताच तिचे काका परशुराम सीताराम पावरा यांनी खासगी वाहनाने शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटल येथे तिला दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात रविवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

Web Title: Suicide of minor girl by hanging, incident in Shirpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.