शिरडाण्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:12 PM2020-08-14T12:12:38+5:302020-08-14T12:13:00+5:30
धुळे तालुका : आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा भावाचा आरोप
धुळे : तालुक्यातील शिरडाणे प्ऱ डांगरी येथील निखील रतीलाल पाटील (२२) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली नसून त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप त्या तरुणाचा भाऊ सचिन पाटील याने केला आहे़
धुळे तालुक्यातील शिरडाणे प्ऱ डांगरी येथील निखील पाटील या तरुणाने आयटीआयचे शिक्षण घेतल्यानंतर तो औरंगाबाद, नाशिक येथील कंपनीत कामाला होता़ कोरोनामुळे लॉकडाऊनचा काळ सुरु झाल्याने निखील हा आपल्या गावी परतला होता़ तो सध्या शिरडाणे प्ऱ डांगरी येथेच होता़ अशातच गावातील चार ते पाच जणांकडून त्याला मानसिक त्रास दिला जात होता़ त्यातून त्याने स्वत:च्या घरातच गळफास लावून घेत आपले जीवन संपविले़ ही घटना पहाटे पाच वाजेच्या सुमारास लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़
दरम्यान, त्याने आत्महत्या केली नसून त्याला आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप त्याचे नातेवाईक व भाऊ सचिन पाटील यांनी केला आहे़ निखील याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे काम सुरु आहे़