धुळे शहरातील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 02:16 PM2017-11-27T14:16:26+5:302017-11-27T17:21:24+5:30
भिमनगरातील घटना : शहर पोलिसात नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री रोडवरील भिमनगरात एका विवाहितेने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली़ ही बाब सोमवारी पहाटे उजेडात आली़ याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली़
साक्री रोडवरील भिमनगरात राहणाºया सुमीत कुवर यांच्याशी वर्षभरापुर्वीच दोंडाईचा येथील अक्षदा हिच्याशी विवाह झाला़ सुमीत कुवर हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ येथील कर्मचारी असून सध्या ते बंदोबस्तासाठी नाशिक येथे कार्यरत आहेत़ भिमनगरात सासू, सासरे आणि अक्षदा हे तिघे राहतात़ रविवारी नेहमीप्रमाणे हे तिघे झोपी गेले़ पहाटे ५ वाजून २० मिनीटांनी या भागात पिण्याचे पाणी आले़ त्यामुळे सुन अक्षदा हिला उठविण्यासाठी सासू सासरे गेले असता तिच्या खोलीमध्ये साडीच्या आधार घेवून तिने पंख्याला गळफास घेतला असल्याचे समोर आले़ ही घटना रविवारी रात्री ९ ते सोमवारी पहाटे ५ वाजून २० मिनीटांच्या दरम्यान (वेळ निश्चित नाही) घडली असल्याचा अंदाज आहे़ तिला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता सकाळी ६ वाजून ५० मिनीटांनी डॉ़ अश्विनी भामरे यांनी मयत घोषीत केले़ या घटनेची सुरेश इसन कुवर (रा़भिमनगर, साक्री रोड, धुळे) यांनी सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास धुळे शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली़ याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षा जाधव करीत आहेत़ या घटनेमुळे भिमनगरात हळहळ व्यक्त होत आहे़