चिमठावळच्या शेतक-याची विष घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:26 PM2018-12-01T12:26:30+5:302018-12-01T12:29:23+5:30

उपचारादरम्यान मृत्यू : गावात व्यक्त होतेय हळहळ

Suicides by taking a toddler's toxic poison | चिमठावळच्या शेतक-याची विष घेऊन आत्महत्या

चिमठावळच्या शेतक-याची विष घेऊन आत्महत्या

Next
ठळक मुद्देचिमठावळ येथील शेतकºयाची आत्महत्याकर्जबाजारीपणाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील चिमठावळ येथील युवराज सुर्यवंशी (५५) यांनी स्वत:च्या शेतात विष घेतले़ त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिमठावळ गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे़ दरम्यान, कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता आहे़ 
चिमठावळ येथील शेतकरी युवराज बापू सुर्यवंशी यांच्यावर बँकेचे एक लाख आणि फायनान्स कंपनीचे २ लाख असे ३ लाखांचे कर्ज होते़ त्यांनी शेतात कपाशीची लागवड केली होती़ मात्र, त्यांना अपेक्षित उत्पन्न आले नाही़ दुष्काळ असल्याने कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत ते होते़ अशातच स्वत:च्या शेतात जावून काहीतरी विषारी औषध त्यांनी घेतले़ ही घटना २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली़ घटना लक्षात येताच त्यांना सोनगीर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांचा मुलगा खुशाल याने युवराज सुर्यवंशी यांना रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरु असताना शनिवार १ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषीत केले़ यावेळी दीपक जाधव, दह्याणेचे गोकूळ मराठे, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ राजपूत यांच्यासह इतरांनी यावेळी उपचारासाठी मदत केली़ 

Web Title: Suicides by taking a toddler's toxic poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.