उन्हाळी कांदा पीक धोक्यात

By admin | Published: February 2, 2016 12:25 AM2016-02-02T00:25:43+5:302016-02-02T00:25:43+5:30

कूपनलिकांची पाणीपातळीदेखील खालावत चालल्याने उन्हाळी कांदा पीक धोक्यात आले आहे.

Summer onion crop risk | उन्हाळी कांदा पीक धोक्यात

उन्हाळी कांदा पीक धोक्यात

Next

विहिरीतील पाण्याची पातळी झपाटय़ाने खालावत असल्याने तसेच कूपनलिकांची पाणीपातळीदेखील खालावत चालल्याने उन्हाळी कांदा पीक धोक्यात आले आहे.

सद्य:स्थितीत कांद्याचे दर प्रती क्विंटलला 800 ते एक हजार रुपयांर्पयत आहेत. हाच दर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात तीन हजारांर्पयत होता, तर त्या आधी सप्टेंबर्पयत पाच हजार रुपये प्रती क्विंटलने विक्री झाला. कांद्याचे असे चढे दर मिळत असल्याने साहजिकच शेतकरीवर्गाच्या नजरा कांदा पिकाकडे वळल्या. परिणामी दीड ते दोन हजार रुपये प्रती किलोने कांदा बियाणे खरेदी करून रोपे तयार करण्यात आली व रेकॉर्ड ब्रेक कांदा लागवडही करण्यात आली. त्याला कारणही तसेच होते. बाजारात कांद्याला उच्चांकी भाव मिळतोय. सप्टेंबर महिन्यातील जोरदार पावसाने उपशावर असणा:या विहिरी तुडुंब भरून आल्याने कांदा पीक हमखास निघण्याची खात्री झाली. मात्र त्यानंतर पाऊसच न झाल्याने नद्या-नाले गेल्या दोन महिन्यांपासूनच आटण्यास सुरुवात झाली आहे. केटीवेअर बंधारे, लहान बंधारे पूर्णपणे कोरडे झाल्याने आता गुरांनादेखील पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.

विहिरी आटण्याच्या मार्गावर

डिसेंबरर्प्यत ब:यापैकी चालून हंगाम निघण्याची आशा शेतकरीवर्गात बळावली होती. मात्र महिनाभरापासून विहिरीतील पाणीपातळी कमालीची खालावत आहे. दिवसभर चालणा:या विहिरी आता जेमतेम एक ते दीड तासार्पयत टिकून राहतात. तेही दिवसातून एकदाच उपसा होत आहे. एकदा उपसा झाला की, दुस:या दिवशीच पिकांना पाणी मिळत आहे. विहिरींची अशी अवस्था झाल्याने रब्बीतील गव्हाचे पीकही वाया जाण्याची भीती असल्याने कांद्याचे पीक निघण्याची शक्यताच कमी असल्याचे दिसून येत आहे.

कूपनलिकाही पडू लागल्या कोरडय़ा

हजारो रुपये भांडवली खर्च करून कांद्याचे पीक जगविण्यासाठी शेतकरीवर्गाने कंबर कसली आहे. एकीकडे विहिरी दिवसातून जेमतेम उपसा करीत असून, कूपनलिकाही बंद पडू लागल्या आहेत. विहिरींवर पूर्ण बागायत होत नसल्याने पाणी अपूर्ण पडू लागल्याने बहुतेक शेतक:यांनी कूपनलिका केल्या आहेत. 700 ते 800 फुटांर्पयत करण्यात आलेल्या कूपनलिकाही बंद पडू लागल्या आहेत. एकीकडे विहिरी जेमतेम तासभर चालत असल्याने व कूपनलिकाही बंद पडत असल्याने कांदा पीक जगविण्यासाठी शेतक:यांची घालमेल सुरू झाली आहे.

शेजारील शेतक:यांचीही कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती असल्याने पाण्याअभावी शेतकरीवर्गावर मोठे संकट घोंगावू पहात आहे. हे संकट उत्तरोत्तर अधिक गहिरे होण्याचे संकेत मिळत असल्याने शेतकरीवर्गही हवालदिल झाल्याचे चित्र आहे.

Web Title: Summer onion crop risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.