भर उन्हाळ्यात पांझरा नदी झाली प्रवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 09:28 PM2020-05-07T21:28:04+5:302020-05-07T21:28:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : पावसाळ्यानंतर कोरडीठाक पडलेली पांझरा नदी भर उन्हाळ्यात पुन्हा खळखळून वाहू लागली आहे़ पाणीटंचाईवर मात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पावसाळ्यानंतर कोरडीठाक पडलेली पांझरा नदी भर उन्हाळ्यात पुन्हा खळखळून वाहू लागली आहे़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे़ पांझरा नदीत सोडलेले पाणी गुरूवारी धुळे शहरापर्यंत पोहोचले़
पांझरा नदीला पाणी आल्यामुळे धुळेकरांना सुखद दिलासा मिळाला आहे़ एरवी नदीला पाणी आले की नदीकाठी धुळेकरांची गर्दी होत असे़ परंतु यावेळी लॉकडाउनमुळे धुळेकरांना पांझरेचा प्रवाह पाहण्यापासुन वंचित राहावे लागले़ नदीकाठच्या रहिवाशांना मात्र घरबसल्या नदीत पाणीही दिसले आणि खळखळणाऱ्या पाण्याच्या आवाज ऐकण्याचा आनंदही मिळाला़
पाणीटंचाई निर्माण झाल्याने नदीकाठच्या तीन तालुक्यातील गावांनी गेल्या दोन महिन्यांपासुन पाणी सोडण्याची मागणी केली होती़
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पाटबंधारे विभागाने चार तारखेला सायंकाळी ३०० क्युसेक्स पाण्याचे आवर्तन सोडले़
धुळे तालुक्यासह अमळनेर तालुक्यातील १६ गावांना आणि शिंदखेडा तालुक्यातील बेटावद, पढावदसह इतर गावांना पाण्याचा लाभ होणार आहे़