उन्हाची झळ, धरणे गाठतायत तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 05:05 PM2019-04-12T17:05:36+5:302019-04-12T17:05:58+5:30

शिरपूर : करवंद धरणातही अल्पसा साठा, १० लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट

Summer spot | उन्हाची झळ, धरणे गाठतायत तळ

dhule

googlenewsNext

शिरपूर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागले आहेत़ परिणामी आदिवासी भागात टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत़ तालुक्यातील १३ पैकी १० लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट झाल्यामुळे पशुधन धोक्यात आले आहे़ संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे़ विशेषत: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करवंद धरणात २० टक्के पाणी साठा असल्यामुळे शहरवासियांचे पाणीविना हाल होवू नये म्हणून शिरपूर नगरपालिकेने यापूर्वीच उपाययोजना करून ठेवल्या आहेत़ असे असतांना शहरात निजर्तुंक पिण्याचे पाणी पुरविले जात आहे़
शिरपूर तालुक्यात २ मध्यम प्रकल्पासह १३ लघु प्रकल्प आहेत़ शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून आतापर्यंत दोनशेच्यावर बंधारे बांधण्यात आली आहेत़ तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक गावांमध्ये ओढे, नाले, नदी व तलावांचे प्रशासनाने लोकसहभागातून पुनरुज्जीवन केले आहे़ शिरपूर पॅटर्न व जलयुक्तमुळे गावे बहरली तर शिवारं हिरवीगार झाली़
गत पावसाळ्यात बहुतांशी धरणे ओव्हर फ्लो सुध्दा झाली होती, परंतु काही बंधारे कमी-अधिक पाऊसामुळे भरली नव्हती़ पश्चिम भागातील बंधाºयात अडविण्यात आलेले पाणी काही महिन्यानंतर ते आटलीत़ गेल्या वर्षी पावसाने सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला मात्र नदी-नाले वाहून नेणारा पाऊस न झाल्यामुळे बंधारे-धरणे पाण्याने भरली नाहीत़ त्यामुळे आता जवळपास सर्वच धरणे-बंधारे कोरडी झाली आहेत़
सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने आदिवासी भागातील गावांमधील नैसर्गिक जलस्त्रोत हळूहळू आटू लागले आहेत़ परिणामी ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ आदिवासी पाड्यांवर तर २-४ किमीपर्यंत पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे़ काही पाड्यांवर तर पाण्याच्या भटकंतीसाठी मुल-मुली शाळेला दांडी मारत आहेत तर काहींनी शाळेला कायमचा बाय दिला आहे़
आतापर्यंत तालुक्यात एकही गावात टँकर नाही़ प्रशासनाच्यावतीने ग्रामस्थांना दिलासा देवून उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत़ अधिक टंचाईग्रस्त गावांमध्ये मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर करण्यात आलेली आहे़ त्यांचे अंदाजपत्रकासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे़ लवकरच या गावांमध्ये पाणी टंचाई दूर केली जाणार आहे़ प्रस्तावित गावांमध्ये बोअरविहिर करण्याची मागणी केली जात आहे़
एकीकडे जलस्त्रोत आटत चालले असतांना दुसरीकडे धरणांमधील पाणीसाठाही खालावत चालला आहे़ करवंद व अनेर मध्ये प्रकल्पातच बºयापैकी पाण्याचा साठा आहे़ त्यापैकी करवंद धरणाचे पाणी शहरासाठी आरक्षित करण्यात आलेले आहे़
आजमितीस या धरणात ३़३४ दशघमी म्हणजेच २०़६५ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे़ त्यात शिरपूर नगरपालिकेने २़८३ दशघमी एवढे पाणी आरक्षित केले आहे, तसेच करवंद येथील मका फॅक्टरीने सुध्दा पाणी आरक्षित केले आहे़ याशिवाय या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे़ त्यामुळे या धरणातील पाणीसाठी मे अखेरपर्यंत संपण्याची शक्यता नाकारता येत नाही़ २०१३ मध्ये हवाई सर्व्हेक्षण होवून या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याचे समोर आले आहे़ धरण बांधतेवेळी या धरणाची पाणीसाठा क्षमता ५० दशघमी एवढी होती़ मात्र २०१३ च्या सर्व्हेक्षणापर्यंत पाणीसाठा क्षमता १८़२६ दशघमी इतका राहीला़ शहरात संभाव्य पाणी टंचाई भासवू नये म्हणून नगरपालिकेने आधीच शहरातील सर्वच पाणी टाक्यांवर टयुबवेल केल्या आहेत़ फिल्टरशन प्लॅन येथे सुध्दा टयुबवेल व तापी फिल्टर प्लॅन सुरु केले.
१० प्रकल्पात ठणठणाट
तालुक्यातील करवंद धरणात २०.६५ टक्के, अनेर ५४.३३, अभणपूर ४०, नांदर्डे ६ आणि गधडदेव धरणात ८ टक्के जलसाठा आहे.तर लौकी, खामखेडा, जळोद, कालीकराड, वाडी, मिटगांव, बुडकी, रोहिणी, विखरण आणि वकवाड धरणात पाण्याचा ठणठणाट आहे.

Web Title: Summer spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे