धुळे शहर हद्दवाढीतील गावांमध्ये होणार मुलभूत सुविधांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 04:11 PM2018-02-21T16:11:31+5:302018-02-21T16:27:53+5:30

शासनाकडे करणार निधीची मागणी

Surveys of basic amenities to be found in the cities of Dhule city | धुळे शहर हद्दवाढीतील गावांमध्ये होणार मुलभूत सुविधांचे सर्वेक्षण

धुळे शहर हद्दवाढीतील गावांमध्ये होणार मुलभूत सुविधांचे सर्वेक्षण

googlenewsNext
ठळक मुद्दे- गाव विकासासाठी भरीव निधीची महापालिकेला अपेक्षा- रस्ते, गटारी, पथदिवे, स्वच्छता, पाणीपुरवठा या सुविधांचे सर्वेक्षण - बहूतांश गावांमध्ये सुविधांची वाणवा

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहर हद्दवाढ लागू झाल्याने मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या दहा गावांमध्ये रस्ते, गटारी, शौचालय, पथदिवे, स्वच्छता यांसारख्या मुलभूत सेवा सुविधांचे सर्वेक्षण केले जाणार आहे़ त्यानुसार शासनाकडे निधीची मागणी करण्यात येणार आहे़
धुळे शहर हद्दवाढीची अधिसूचना ५ जानेवारी २०१८ ला लागू झाली आहे़ त्यानुसार वलवाडी, महिंदळे, वरखेडी, बाळापूर, पिंपरी, अवधान, चितोड, मोराणे, नकाणे, भोकर व नगाव या ११ गावांचा शहर हद्दवाढीत समावेश झाला आहे़ मात्र नगाव गाव हे गावठाण क्षेत्राव्यतिरीक्त आहे़ तर उर्वरीत १० गावांचा समावेश गावठाण क्षेत्रासह झाल्यामुळे त्याठिकाणी मुलभूत सोयी-सुविधा पुरविणे आवश्यक आहे़ त्यामुळे मनपाकडून लवकरच संबंधित गावांमध्ये सर्वेक्षण करून मुलभूत सुविधांसाठी आवश्यक कामांचे अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे़  त्यानुसार निधीची मागणी शासनाकडे केली जाणार आहे़ हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या बºयाच गावांमध्ये प्राथमिक सुविधांची देखील वाणवा असून त्यांना सुविधा पुरविणे गरजेचे आहे़ 
 

Web Title: Surveys of basic amenities to be found in the cities of Dhule city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.