घरफोडी करणाºया संशयिताला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:47 PM2017-11-26T13:47:50+5:302017-11-26T13:49:05+5:30
एलसीबी : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शहरात गोपनीय माहितीच्या आधारे विशेष मोहीम राबविली़ यात घरफोडी करणाºया एका संशयितास ताब्यात घेऊन चाळीसगाव रोड पोलिसांकडे त्याला सुपुर्द करण्यात आले़ ़
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात घरफोडीसह चोºयांचे प्रमाण वाढले आहे़ या अनुषंगाने पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांनी दुचाकी चोरी, चेन स्रॅचिंग, घरफोडी यासारखे विविध गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथक तयार केले आहेत़ सदर पथक सक्रीय झाले असून गुन्हेगारांचा शोध घेण्याकामी गोपनीय माहितीचा उपयोग केला जात आहे़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील विंचुरकर, महेंद्र कापुरे, संदीप थोरात, पोलीस कर्मचारी गौतम सपकाळे, विजय सोनवणे या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती़ त्या माहितीच्या आधारे पथकाने विशेष मोहिम राबविली़ त्यात संशयित आसिफ शेख इस्माईल उर्फ आसिफ भंगाºया (२३) रा़ मारुती मंदिराजवळ, वडजाई रोड, धुळे याला ताब्यात घेण्यात आले़ त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आझादनगर भागातील छोटी बावडीजवळील परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली़ घरफोडीची ही घटना १२ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान घडली होती़ चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तडवी यांच्याकडे आसिफ भंगाºया याला सोपविण्यात आले़ घटनेचा पुढील तपास चाळीसगाव पोलीस ठाणे करीत आहेत़