संशयित चोरटय़ांना पकडले
By admin | Published: January 11, 2017 11:56 PM2017-01-11T23:56:14+5:302017-01-11T23:56:14+5:30
मोहनशेठ नगरात बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरी करण्याचा असफल प्रय} करून पळ काढताना कॉलनीवासीयांच्या सतर्कतेमुळे एक पुरुष व दोन महिला यांना अक्षरश: फिल्मीस्टाईल पाठलाग करून पकडले.
दोंडाईचा : शहरात चोरी, घरफोडय़ांचे प्रमाण वाढत असतानाच मोहनशेठ नगरात बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरी करण्याचा असफल प्रय} करून पळ काढताना कॉलनीवासीयांच्या सतर्कतेमुळे एक पुरुष व दोन महिला यांना अक्षरश: फिल्मीस्टाईल पाठलाग करून पकडले.
गुरुवारच्या भाजीपाला बाजारात तीन जणांचे मोबाइल चोरीस गेले. त्या नंतर रविवारी नारायणसिंग गिरासे या जिल्हा मध्यवर्ती बॅँक कर्मचा:याकडे 2 लाख 9 हजार रुपयांची घरफोडी झाली.
त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. नारायणसिंग गिरासे दररोज पोलीस ठाण्यात चकरा मारत आहेत. परंतु तपास सुरू आहे एवढेच उत्तर मिळते. मात्र चोराची हिंमत वाढली. बुधवारी पहाटेच्या सुमारास मोहनशेठ नगरात देवानंद बोरसे यांच्याकडे घरफोडीचा प्रय} झाला. चोरटय़ांनी टॅमीच्या साहाय्याने घराच्या दरवाजा तोडून कपाटातून चोरी करण्याचा प्रय} केला. परंतु चोरी करताना एक वस्तू पडल्याच्या आवाजाने शेजा:यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यामुळे एक पुरुष व दोन संशयित महिला चोरटे घरातून पळत सुटले. त्यांना सतर्क असलेल्या कॉलनीतील नागरिकांनी मोठय़ा शिताफीने पकडले पुरुष चोरटय़ाकडे टॅमी व महिलांकडे धारदार चाकू आढळून आला.
पोलिसांनी साहित्यासह आरोपी अंकिराज रायसिंग चौहान ,जकिराबाई अंकिराज चव्हाण व मुरानीबाई बलाल चव्हाण या तिघा संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान अजून एक संशयास्पद तरुणी बाहेरून चोरटय़ांना मोबाइल द्वारे माहिती पुरवत होती ती पसार झाली आहे . भरदिवसा चोरी व घरफोडीच्या घटना होत असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण आहे.