संशयित नगरसेवकांची बाजू मांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:55 PM2019-03-19T22:55:50+5:302019-03-19T22:56:09+5:30
जळगाव घरकूल प्रकरण : अॅड जितेंद्र निळेंचा प्रभावी युक्तिवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जळगाव घरकूल प्रकरणी संशयित नगरसेवकांची बाजू मांडताना अॅड़जितेंद्र निळे यांनी धुळेन्यायालयात मंगळवारी प्रभावीपणे युक्तिवाद केला़
विशेष न्यायाधीश डॉ़सृष्टी नीळकंठ यांच्या समोर जळगाव घरकूल प्रकरणाचे कामकाज सुरु आहे़ मंगळवारी अॅड़जितेंद्र निळे यांनी न्यायालयात युक्तिवाद करून संशयित नगरसेवकांची बाजू मांडली़ या प्रकरणाचे फिर्यादी तथा तत्कालिन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी ऐकीव माहितीवरुन न्यायालयात साक्ष दिली असून ती साक्ष कायद्याने कशी ग्राह्य धरता येत नाही हे अॅड़ निळे यांनी पटवून दिले़ याशिवाय जळगाव नगरपालिकेतील घरकूल प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचा लावण्यात येत असलेला आरोप कसा चुकीचा आहे हेही त्यांनी मुद्देसूद पटवून दिले़ तत्कालिन आयुक्त प्रवीण गेडाम हे पदावर असताना तत्कालिन नगरसेवकांनी शहरातील समस्या सोडविण्याबाबत मागणी केली होती़ मात्र, या समस्या सोडविण्यात गेडाम अकार्यक्षम ठरल्याने तत्कालिन नगरसेवकांनी गेडाम यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता़ या बाबीचा राग येऊन गेडाम यांनी तत्कालिन नगरसेवकांविरुध्द खोटा गुन्हा दाखल केला असावा, अशी शक्यता असल्याचे सांगून ही बाब अॅड़ निळे यांनी युक्तीवादाद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली़
महापालिकेचा कोणताही ठराव बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आल्यास तो विखंडीत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांचे आहेत़ मात्र, त्या काळी पारित केलेले ठराव विखंडीत करण्यात आले नसल्याची बाबही अॅड.निळे यांनी मांडली. तसेच यापूर्वी खान्देश बिल्डर्सच्या माध्यमातून नगरपालिकेच्या क्षेत्रात अनेक घरकुले बांधण्यात आलेली असून त्यांचे काम यशस्वी झाली असून अनेक कुटुंबे त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत, हा मुद्दा अॅड़ निळे यांनी युक्तिवादात प्रकर्षाने मांडला़