मुख्यालयी न थांबल्यास आरोग्य विभागातील कर्मचा:यांचे निलंबन
By Admin | Published: June 18, 2017 01:06 PM2017-06-18T13:06:45+5:302017-06-18T13:25:50+5:30
जि.प.सीईओंचे आदेश : आरोग्य बैठकीत अधिकारी, कर्मचारी धारेवर
ऑनलाईन लोकमत
शिरपूर,दि.18 - तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य व उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचा:यांनी मुख्यालयी थांबणे बंधनकारक आहे. तसे न आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल़ आदिवासी भागातील काही गावांमध्ये घरी प्रसूती होण्याचे प्रमाण अधिक आहे, ते कमी करावे अन्यथा निलंबनाची कारवाई करण्याचे संकेतही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी येथे आयोजित बैठकीत दिल़े
येथील पंचायत समिती सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी शनिवारी आरोग्य विभागाचा आढावा घेतला़, त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बाळासाहेब चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ आऱ व्ही़ पाटील, गटविकास अधिकारी एम़ डी़ बागुल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ प्रताप पवार, डॉ़ शीतल पाटील आदी उपस्थित होत़े