गुदमरून मृत्युप्रकरणी घातपाताचा संशय

By admin | Published: March 28, 2017 03:13 AM2017-03-28T03:13:51+5:302017-03-28T03:13:51+5:30

अकबर चौकातील घराला आग लागल्यामुळे रविवारी पुजारी राम शर्मा यांच्या कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू

Suspicion of assault | गुदमरून मृत्युप्रकरणी घातपाताचा संशय

गुदमरून मृत्युप्रकरणी घातपाताचा संशय

Next

 धुळे : अकबर चौकातील घराला आग लागल्यामुळे रविवारी पुजारी राम शर्मा यांच्या कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याप्रकरणी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली आहे. फुटेजमध्ये घटनेवेळी दोन संशयित घराभोवती घुटमळत असल्याचे दिसत असल्याने घातपाताचा संशय आहे.
पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत़ भुसे यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली़ मृतांचे नातेवाईक व दक्षिणमुखी मारूती मंदिरातील भक्तगणांनी पालकमंत्र्यांकडे म्हणणे मांडले. दोन व्यक्ती घटनास्थळापासून अकबर चौकाकडे जाऊन वळसा घालून लांब अंतरावरून घटनास्थळाकडे पाहत असल्याचे दिसून येत आहे़ त्यापैकी एक जण आगीचा भडका होताच पसार होत असल्याचे व दुसरा घटनास्थळाकडून जात असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे अनोळखी इसमांवर संशय आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळतर्फे घटनास्थळावरून नमुने घेण्यात आले आहेत़ त्यांच्या तपासणीनंतर आगीचे कारण स्पष्ट होणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Suspicion of assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.