जिल्हा रूग्णालयात घेतले जाणार स्वॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:44 PM2020-04-29T22:44:36+5:302020-04-29T22:45:19+5:30
आतापर्यत २२ तपासण्या : हिेरे महाविद्यालयातील कामाचा भार कमी होणार
धुळे : येथील जिल्हा रूग्णालयात देखील कोरोना संशयित रूग्णांचे स्वॅब घेण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्हा रूग्णालयात बुधवारी ९ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेल्या ९ व्यक्तींचे स्वॅब घेतल्याची माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली.
याआधी फक्त हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वॅब घेण्यात येत होते. स्वॅब जिल्हा रूग्णालयात घेण्यात येत असल्याने आता हिरे वैद्यकीय रूग्णालयावर पडणार ताण कमी होणार आहे़ त्यामुळे डॉक्टरांना रूग्णांवर निदान करण्यास अडचण भासणार नाही़
हिरे मधील त्या डॉक्टरांना १४ दिवसांसाइी संस्थात्मक क्वारंटाईन
भाऊसाहेब हिरे रूग्णालयात कोरोना संशयित रूग्णांचे संपर्कात आलेल्या डॉक्टरांना व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना १४ दिवसांसाठी संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये रहावे लागणार आहे. क्वारंटाईनच्या काळात डॉक्टरांचे दोन वेळेस स्वॅब घेण्यात येणार आहेत. रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना पुन्हा आरोग्य सेवा देता येणार आहे, अशी माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिक्षक राजकुमार सुर्यवंशी यांनी दिली.
साक्रीच्या मृत रूग्णावर
धुळ्यात अंत्यसंस्कार
येथील भाऊसाहेब हिरे रूग्णालयात बुधवारी सकाळी साक्री येथील कोरोना बाधीत रूग्णाचा मृत्यू झाला होता. धुळ्यातपासून साक्री शहर लांब अंतरामुळे कोरोना बाधीत शवाला साक्री येथे घेऊन जाणे शक्य नसल्याने मृत रूग्णावर धुळे शहरातच अंत्यसंस्कार करण्यात यावे असे पत्र महानगरपालिकेला दिले आहे़ त्यामुळे अन्य विषाणू प्रार्दुभाव होणार नाही़ अशी माहिती माहिती हिरे रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक राजकुमार सुर्यवंशी यांनी दिली.