धुळयात ‘स्वाईन फ्लू’चे दोन रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 04:54 PM2017-08-23T16:54:11+5:302017-08-23T16:54:38+5:30

हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी

swine fule two pationt in dhule city | धुळयात ‘स्वाईन फ्लू’चे दोन रूग्ण आढळले

धुळयात ‘स्वाईन फ्लू’चे दोन रूग्ण आढळले

Next
ठळक मुद्देनागरिकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे़ताप आल्यास अंगावर न काढता, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय अन्य गोळ्या, औषधी घेऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मुंबई-पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी स्वाईन फ्लूच्या रूग्णसंख्येत वाढ होत असतांनाच धुळयातही स्वाईन फ्लूचे दोन रूग्ण आढळून आहेत़ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आलेल्या तपासणीत संबंधित रूग्णांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ 
राज्यात मुंबई व पुणे या दोन शहरांमध्ये स्वाईन फ्लूची साथ सुरू आहे़ धुळयातून या दोन्ही शहरांमध्ये जाणाºया-येणाºयांची संख्या मोठी असल्याने स्वाईन फ्लूचा प्रसार झाल्याचा संशय आहे़  त्यातच गेल्या काही दिवसांत पावसानेही सातत्याने हजेरी लावल्याने स्वाईन फ्लूला पोषक वातावरण निर्माण झाले आहे़ त्यामुळे सद्य:स्थितीत एका नामांकित खासगी रूग्णालयात दोन रूग्ण आढळून आले आहेत़ तर अन्य खासगी रूग्णालयांमध्येही स्वाईन फ्लू चे रूग्ण आढळून आल्याची चर्चा आहे़ या पार्श्वभूमीवर मनपा आरोग्य विभागाने सर्व खासगी हॉस्पिटल्सशी संपर्क साधून रूग्ण आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन केले आहे. 

Web Title: swine fule two pationt in dhule city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.