रस्ता कामात गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 08:32 PM2020-10-06T20:32:56+5:302020-10-06T20:33:09+5:30
बिरसा क्रांती दल : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष येऊन रस्त्याची पहाणी करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ५० लाखाचा रस्ता गायब झाला आहे. त्या विरोधात बिरसा क्रांती दलाच्या उलगुलान संघटनेतर्फे गांधी जयंतीच्या दिवशी धुळ्यात लाक्षणिक उपोषण करण्यात आले़ दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
तालुक्यातील रामा-१ ते दोंडवाडीपाडा (ग्रामा ८०) या रस्त्याकरीता ५० लाख रूपये मंजूर झाले होते़ मात्र संबंधित ठेकेदाराने तो रस्ता न करता अधिकाऱ्यांच्या संगनमताने भ्रष्ट्राचार केला असा त्यांचा आरोप आहे.
या रस्त्याची चौकशीकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एच़डी़भोसले आणि त्यांच्या पथकाने पहाणी केली़ मात्र चौकशी अधिकाºयांना तयार झालेला रस्ता दिसलाच नाही. ते दुसºयाच ठिकाणी गेलेत़ त्याचवेळी बिरसा क्रांती दलाच्या पदाधिकाºयांनी त्यांच्या लक्षात आणून देत,रस्त्याच्या प्रत्यक्षस्थळी आणले. मात्र तो रस्ता झाला नाही हे भेट दिल्यानंतर लक्षात आले़
जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक आणि संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून रस्त्याची पाहणी करून दोंडवाडीपाडा येथील आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्याची मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे़
संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात यावे अशी मागणी केली आहे.
उपोषणाला बिरसा क्रांती दलाचे जिल्हा सल्लागार विलास पावरा, तालुका कार्याध्यक्ष साहेबराव पावरा, गेंद्या पावरा, आदिवासी विकास परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष दारासिंग पावरा, विश्वास पावरा, शांतिराम पावरा, सागर मोरे यांनी सहभाग नोंदविलेला होता.