पाणीटंचाई उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 08:33 PM2020-05-19T20:33:42+5:302020-05-19T20:34:06+5:30

कुणाल पाटील : पाणीपुरवठा योजनांचा घेतला आढावा

Take measures for water scarcity | पाणीटंचाई उपाययोजना करा

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाला केल्या़
तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना, पूनरुज्जीवीत करावयाच्या सामुहीक योजना, प्रगतीपथावरील राष्ट्रीय पेयजल योजना आणि मुख्यमंत्री पेयजल योजनांचा आढावा घेण्यासाठी आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्या निवास्थानी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली़
या बैठकीला कार्यकारी अभियंता ब्रजेश सेंगर, उप कार्यकारी अभियंता पढ्यार, उप अभियंता जयदिप पाटील, शाखा अभियंता विजय गावीत, राहुल सैंदाणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता धोत्रे आदी अधिकारी उपस्थित होते़
अंचाळे तांडा, तांडा कुंडाणे गावात विहीर अधिग्रहण करण्यात आली आहे़ बाबरे, निकुंभे आणि नावरा गावातही खोजगी विहीर अधिग्रहीत करण्याचा प्रस्ताव आहे़ मे अखेरपर्यंत जुन्नेर, कुंडाणे वेल्हाणे, कुंडाणे वार, जुनवणे, चिंचवार आणि रामनगर वस्ती आदी गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईची शक्यता आहे़ त्यामुळे या गावांमध्ये तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी दिल्या़ या गावांसाठी विहीर अधिग्रहण आणि टँकरचा प्रस्ताव असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले़
आंबोडे, बोरसुले, सावळी तांडा, गरताड, निमडाळे, नंदाळे खु़, नांद्रे, नेर, मुकटी, नवलनगर येथील पाणी योजनांचे काम त्वरीत पूर्ण करावे, ठेकेदारांना मुदतीत काम करण्याचे आदेश द्यावेत असे आमदार पाटील यांनी सांगितले़

Web Title: Take measures for water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे