डेंग्यू, मलेरियापासून दक्षता घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:46 PM2020-04-29T22:46:02+5:302020-04-29T22:46:52+5:30
महापालिका : मलेरिया कर्मचारी करणार घरोघरी जनजागृती
धुळे : शहरात हिवतापाचा प्रसार करणाऱ्या डासांचा समूळ नायनाट करण्यासाठी तसेच डासांची उत्पती स्थाने नष्ट करून हिवतापाला आळा घालण्यासाठी हिवताप विभागामार्फेत घरोघरी जनजागृती केली जाणार आहे़
हिवताप हा कीटकजन्य आजार असून एक गंभीर व जीवघेणा आजार आहे. तो प्लाझमोडियम या एकपेशीय परोपजीवी रोगजंतूपासून होतो. हिवतापाचे रोगजंतू मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर यकृत व प्लीहाच्या पेशींमध्ये त्यांची वाढ होते. तेथे त्यांचे जीवनचक्र पूर्ण होण्यास ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर रोगजंतू रक्त प्रवाहात मिळून रक्तातील तांबड्या पेशींवर हल्ला करतात. या रोग जंतूंना मारण्यासाठी रुग्णाच्या शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे त्याला जोराची थंडी वाजून येते. रुग्णास मळमळल्या सारखे वाटते. काही वेळेस उलट्या होतात. डोके दुखते. नंतर घाम येवून ताप उतरतो व गाढ झोप लागते. अशी माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली़ यावेळी कर्मचाºयांना जनजागृतीबाबत माहिती देण्यात आली़
यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ़ अनिल पाटील, सहाय्यक आरोग्य अधिकारी आऱजी़ मराठे, एस़ व्ही़ कुलकर्णी, एस़ बी़ लोंढे, एस़ व्ही़ सोनवणे, सी़ एस़ बागुल, जी़ ए़ मराठे, ए़ बी़ बाविस्कर आदी उपस्थित होते़