शिवदेंवर हल्ला करणाºया दोन्ही युवकांवर कठोर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:48 AM2019-05-29T11:48:43+5:302019-05-29T11:49:11+5:30
निवेदन : भोई समाज महासंघाची पोलीस प्रशासनाकडे मागणी
धुळे : बालसुधार गृहातील (रिमांड होम) कर्मचाºयावर जीवघेणा हल्ला करीत पसार झालेल्या दोन्ही युवकांवर कठोर कारवाई करावी, बालसुधार गृहातील कर्मचाºयांना संरक्षण पुरविण्यात यावे, अशी मागणी धुळे जिल्हा भोई समाज महासंघाने केली आहे़ पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करीत पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली़
साक्री रोडवरील रिमांड होम येथे शिक्षा भोगत असलेले नंदुरबार येथील अल्पवयीन दोघा युवकांनी सोमवारी जेवण वाटप करणारे कर्मचारी आनंदा भिमराव शिवदे यांच्यावर प्राणघातक हल्ला करीत पळ काढला़ जखमी अवस्थेतील शिवदे यांनी इतर मुलांना एका रुममध्ये सुरक्षित बंद केल्यानंतर उपचारासाठी रुग्णालय गाठले़ वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले़
शिवदे यांच्यावर हल्ला करणारे दोन्ही अल्पवयीन मुले ही गुन्हेगारी वृत्तीचे असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी़ तसेच रिमांडहोममधील कर्मचाºयांची संख्या वाढवून संरक्षक भिंतीची उंची वाढवावी, अशी मागणीही या निवेदनातून केली आहे़
शिवदे यांना न्याय न मिळाल्यास भोई समाज रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा या निवेदनातून दिलेला आहे़
पोलीस प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर भोई समाज महासंघाने निदर्शने केली़ यावेळी महासंघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, सचिव वसंतराव तावडे, सखाराम भोई, नाना वाडीले, मधुकर मोरे, चुडामण वाडीले, बन्सी वाडीले, निलेश खेडकर, पंडीत भोई, पंडीत मोरे, मयुर मोरे, कैलास मोरे, रामचंद्र मोरे, रुपेश मोरे, भिमराव वाडीले, राहुल वाडीले, सुवालाल ढोले, अंकूश भोई, संतोष मोरे, ईश्वर मोरे, मनोज मोरे, मुकेश बेडकर, ए़ ए़ फुलपगारे आदी सहभागी झाले होते़