ओटीपी नंबर घेऊन डॉक्टरला 50 हजाराचा गंडा

By admin | Published: June 15, 2017 03:14 PM2017-06-15T15:14:36+5:302017-06-15T15:14:36+5:30

चौथ्या वेळेस नंबर दिला नाही म्हणून त्यांना भ्रमणध्वनीवर शिवीगाळ करून धमकी दिल्याचाही प्रकार समोर आला आह़े

Taking the OTP number, the doctor gets 50 thousand rupees | ओटीपी नंबर घेऊन डॉक्टरला 50 हजाराचा गंडा

ओटीपी नंबर घेऊन डॉक्टरला 50 हजाराचा गंडा

Next

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 15 - बँक व्यवस्थापक बोलत असल्याची बतावणी करून तीन वेळेस ओ़टी़पी नंबर घेऊन येथील डॉक्टराच्या खात्यातून परस्पर 49 हजार 996 रूपये काढून फसवूणक केल्याची घटना उघडकीस आली आहे.  चौथ्या वेळेस नंबर दिला नाही म्हणून त्यांना भ्रमणध्वनीवर शिवीगाळ करून धमकी दिल्याचाही प्रकार समोर आला आह़े  याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
शहरातील जवाहर वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्वार्टर नं़ 3 मध्ये राहणारे डॉ़ शिवेंद्रकुमार  सिंघल (वय 61) यांना मंगळवारी सायंकाळी त्यांच्या भ्रमणध्वनीवर एका फोन आला़ मी बँकेचा व्यवस्थापक बोलत आहे, अशी बतावणी केली़ त्यानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीवर आलेल्या ओ़टी़पी नंबर तीन वेळा घेऊन त्यांच्या जॉईंट बँक खात्यातून 49 हजार 996 रूपये काढून फसवणूक केली़
त्यानंतर पुन्हा सिंघल यांच्याकडून चौथ्या वेळेस ओ़टी़पी क्रमांकाची मागणी केली़ तेव्हा नंबर दिला नाही म्हणून त्यांना भ्रमध्वणीवरून शिवीगाळ करून धमकी दिली़ हा प्रकार मंगळवारी सायंकाळी 5़57 ते 6़57 या एक तासातच घडला़ याबाबत डॉ़ शिवेंद्रकुमार सिंघल यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून अज्ञात आरोपीविरूध्द भादंवि कलम 420, 507 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 

Web Title: Taking the OTP number, the doctor gets 50 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.