तलाठी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 09:57 PM2019-02-15T21:57:17+5:302019-02-15T21:58:02+5:30

कर्ले सजा : कार्यालयाचे ठिकाण वारंवार बदलले जाते; योजनांपासून खातेदार वंचित

Since Talathi is not available, the farmer, Harran | तलाठी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हैराण

dhule

Next

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील कर्ले सजेचा तलाठी उपलब्ध होत नाही तसेच कार्यालयाचे ठिकाणही वारंवार बदलत असल्यामुळे सजेतील खातेदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाच्या योजना सुरू असल्यामुळे मुदतीत कागदपत्रे जमा करण्यासाठी शेतकरी वणवण फिरत आहेत.
मौजे कर्ले सजेत कलवाडे, कर्ले, परसोळे, अक्कलकोस आदी गावांसह मालपूर गावातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या या सजेत शेतजमीनी आहेत. मात्र येथील सजेचा तलाठी वेळेवर कधीच भेटत नसल्याने खातेदार शेतकरी सांगतात.
दूरध्वनीवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल किंवा स्वीच आॅफ असल्याचा आवाज कानावर पडत असल्यामुळे शेतकरी दिवसभर कार्यालयाबाहेर थांबून परतत असल्याचे सांगतात.
आधी या सजेचे तलाठी कार्यालय मालपूर येथे होते. नंतर कर्ले गावात नेण्यात आले. तेथून दोंडाईचा येथे आहे. मात्र येथे सुद्धा दोन ठिकाणी जागेत बदल झाल्यामुळे शेतकरी मात्र इकडेतिकडे हिंडतांना दिसून येत आहेत. कुठललीही पूर्व सूचना व माहिती न देता जागेत बदल होत असल्यामुळे शेतकºयांची खूप मोठी गैरसोय होत असल्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी यात लक्ष घालावे.
सध्या शासनाच्या दोन योजना सुरु असून सन २०१८-१९ चे दुष्काळी अनुदान व प्रधानमंत्री शेतकरी सन्माननिधी याचा लाभ घेण्यासाठी सर्वच शेतकरी आपआपल्या तलाठ्यांच्या शोधात आहेत.
मात्र कर्ले सजेचा तलाठी सहज सापडत नसल्यामुळे या सजेचा खातेदार पूर्णपणे वैतागला आहे.२६ फेब्रुवारी या मुदतीेत घोषणापत्र, आधारकार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक, ८ अ, सातबारा, आपला मोबाईलनंतर आदी कागदपत्रे जमा करावयाची गरज असल्यामुळे सध्या शेतकरी वणवण फिरत आहे.
कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावून सर्व गावांचा विचार करता सोयीच्या मालपूर गावी कर्ले सजेचे तलाठी कार्यालय कायमस्वरुपी करावे, अशी शेतकरी मुकेश उपासनी, पंडीत पाडील, दामोदर माळी, नामदेव अहिरे, शरद वाघ आदींसह शेतकºयांची मागणी आहे.

Web Title: Since Talathi is not available, the farmer, Harran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे