धुळे येथे मजीप्राच्या कार्यालयाला ठोकले ‘टाळे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2017 04:20 PM2017-05-29T16:20:09+5:302017-05-29T16:20:09+5:30
स्थायी समिती सभापतींचे आंदोलन : प्रभागात रस्ता खोदूनही जलवाहिन्यांना विलंब
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.29- शहरात राबविण्यात येत असलेल्या 136 कोटींच्या पाणी योजनेंतर्गत एकविरा देवी मंदिरा रस्त्याला खोदकाम करूनही जलवाहिन्या न टाकल्याने मनपा स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांनी सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नवरंग जलकुंभ परिसरातील कार्यालयास टाळे ठोकल़े जवळपास चार तास अधिकारी व कर्मचा:यांना कोंडून ठेवत सभापतींनी कार्यालयाबाहेरच ठिय्या देऊन तत्काळ काम सुरू करण्याची मागणी केली़
रस्त्याचे खोदकाम पण़़़
शहरात 136 कोटींच्या पाणी योजनेंतर्गत ठिकठिकाणी जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आह़े त्यानुसार एकविरा देवी मंदिर रस्त्यावर देखील ठेकेदाराने जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम केले होत़े मात्र खोदकाम होऊन जवळपास सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नसल्याने नागरिकांचे हाल होत असून दारात खोदून ठेवण्यात आलेल्या खड्डयांमध्ये लहान मुले पडत आहेत़ शिवाय या रस्त्याने देवपूर अमरधाममध्ये अंत्ययात्रा जात असतात़ त्यामुळे अंत्ययात्रेत जाणा:या नागरिकांनाही रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सभापती कैलास चौधरी यांनी स्पष्ट केल़े
स्थायी सभापतींचा ठिय्या!
स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला सकाळी 11 वाजता टाळे ठोकल़े त्यानंतर त्यांनी कार्यालयाबाहेरच ठिय्या आंदोलन केल़े जोर्पयत काम सुरू होत नाही तोर्पयत अधिकारी व कर्मचा:यांना कार्यालयातून बाहेर येऊ देणार नाही, अशी भूमिका सभापती चौधरी यांनी घेतली होती़ दुपारी 4 वाजेर्पयत मजीप्राच्या कार्यालयाला टाळे होते व कर्मचारी आतमध्ये कामकाजात व्यस्त होत़े तर सभापतीही कार्यालयाबाहेर बसूनच होत़े