तापी जलवाहिनीला बाभळेजवळ पुन्हा गळती!
By Admin | Published: May 29, 2017 12:59 PM2017-05-29T12:59:39+5:302017-05-29T12:59:39+5:30
महापालिका : दुरूस्तीला महिना होण्यापूर्वीच गळत्यांची मालिका सुरू, पाण्याचा अपव्यय
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.29 - शहराच्या 60 टक्के भागाला पाणीपुरवठा करणा:या तापी जलवाहिनीला लागलेल्या 22 गळत्यांची दुरूस्ती होऊन महिनाभराचा कालावधीही झालेला नसतांनाच पुन्हा गळत्यांची मालिका सुरू झाली आह़े आधी नरडाणा, सोनगीर व आता बाभळे जलशुध्दीकरण केंद्राजवळ पुन्हा एकदा गळती लागली असून त्यातून उडत असलेल्या कारंजांमुळे ऐन उन्हाळयात पाण्याचा अपव्यय होत आह़े
शहराला पाणीपुरवठा करणा:या तापी जलवाहिनीला लागलेल्या गळत्यांची दुरूस्ती करण्याचे काम मनपाने 3 मे रोजी हाती घेतले होत़े त्याकामी झालेल्या दिरंगाईमुळे अवघ्या शहराला कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागला़ त्यामुळे मनपा प्रशासनावर चांगलीच टिकेची झोड उठली होती़ त्यानंतर पाणीपुरवठा काहीसा सुरळीत होत नाही तोच नरडाणा येथे पुन्हा मोठी गळती लागल्यामुळे पाणीपुरवठय़ाला पुन्हा विलंब झाला होता़ मनपाने त्यावेळी 22 लहान-मोठय़ा गळत्यांची दुरूस्ती केली होती़ मात्र दुरूस्तीला काही दिवस उलटल्यानंतर पुन्हा सोनगीर येथे गळती लागली होती़ एवढेच नव्हे तर अवघ्या दोन दिवसांपूर्वी जलवाहिनीचा नळ सैल करून पाणी चोरीचा प्रयत्न झाल्याने सोनगीरचे सरपंच, उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला़ त्यानंतर आता पुन्हा बाभळे जलशुध्दीकरण केंद्राजवळ गळती लागली असून त्यातून उंच कारंजा उडत आह़े नकाणे तलावातील जलसाठा संपुष्टात येत असल्याने पाटबंधारे विभागाने मनपा प्रशासनाला सुचित केलेले असतांना दुसरीकडे पाण्याचा अपव्यय रोखण्याचे आव्हान मनपा प्रशासनाला पेलावे लागत आह़े सध्या नकाणे तलावात केवळ 23 दिवसांचा साठा शिल्लक आह़े