अखेरच्या दिवशी १७ लाखांची करवसुली
By admin | Published: March 5, 2017 11:46 PM2017-03-05T23:46:59+5:302017-03-05T23:46:59+5:30
धुळे : महापालिकेने जाहीर केलेल्या शास्ती माफी मोहिमेतील ५० टक्के सवलतीचा रविवारी अखेरचा दिवस होता़
धुळे : महापालिकेने जाहीर केलेल्या शास्ती माफी मोहिमेतील ५० टक्के सवलतीचा रविवारी अखेरचा दिवस होता़ त्यामुळे सुटी असतानाही मनपात कर भरण्यासाठी नागरिकांनी रांग लावली होती़ दिवसभरात १७ लाख ७२ हजार रुपयांचा करभरणा झाला़
महापालिकेला शासनाच्या आदेशानुसार मार्च महिन्यात १०० टक्के वसुली करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहे़ तर दुसरीकडे मनपाने शास्ती माफीची मोहीम आधीच जाहीर केली असल्याने नागरिकांना शास्तीवर ५ मार्चपर्यंत ५० टक्के सवलत देण्यात आली होती़ ही मुदत रविवारी संपुष्टात आली़ शेवटच्या दिवशी सकाळपासूनच नागरिकांनी मनपात रांगा लावून कराचा भरणा केला़ दिवसभरात १७ लाख ७२ हजार रुपयांचा भरणा झाला असून १ एप्रिलपासून आतापर्यंत २० कोटी ८ लाख ८५ हजार ४०८ रुपयांची कर वसुली झाली आहे़ महापालिकेने यंदा प्रथमच ३० कोटी रुपयांच्या करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे़ दरम्यान, ५० टक्के सवलतीची मुदत संपुष्टात आली असली तरी २० मार्चपर्यंत २५ टक्के सवलत शास्तीवर दिली जाणार आहे़ मात्र, शास्तीमाफी सवलत जाहीर झाल्यापासून ५० टक्के सवलतीच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या वसुलीची आकडेवारी वसुली विभागाला सांगता आली नाही़