आॅनलाईन कामावर शिक्षकांचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:37 PM2017-09-27T12:37:59+5:302017-09-27T12:54:01+5:30
जिल्हा समन्वय समितीचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन
आॅनलाईन कामावर शिक्षकांचा बहिष्कार
जिल्हा समन्वय समितीचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आॅनलाईन कामाचा बोजा वाढल्यामुळे विद्यार्थी गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे शालार्थ वेतन प्रणाली वगळता, उर्वरित सर्व २३ आॅनलाईन कामावर बहिष्कार टाकण्यासंदर्भात धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांना दिले.
प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही संगणक व इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली नाही. नलाईनचे कामे हजेरी, शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजना, आधार लिंकींग यासारखी जवळपास २३ प्रकारची आॅमुख्याध्यापक, शिक्षक यांनाच करावी लागतात. त्यामुळे शिक्षकांना मानसिक त्रास होतो. वेळोवेळी खाजगी संगणक केंद्रावर जाऊन माहिती भरावी लागते. खाजगी यंत्रणेकडून काम केल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक त्रस्त झाले आहे. शालेय वेतन प्रणाली वगळता अन्य सर्व आॅनलाईन कामावर बहिष्कार टाकत असल्याचे, निवेदनात म्हटले आहे. याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे.
निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, किशोर भामरे, रवींद्र खैरनार, गमन पाटील, देवीदास महाले, मिलिंद वसावे, भगवंत बोरसे, शरद सूर्यवंशी, शिवानंद बैसाणे, बापू पारधी, शरद पाटील, आदी उपस्थित होते.