मुलांना घडविण्याची खरी जबाबदारी शिक्षकांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:00 PM2018-11-29T22:00:40+5:302018-11-29T22:01:24+5:30
कुलगुरू डॉ़ पाटील : धुळे एज्यु़सोसायटीच्या नामकरण सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मुलांना लहान वयात संस्कार, शिक्षण मिळण्यासाठी पालक मुलांना प्राथमिक शाळेत पाठवतात, त्यामुळे प्राथमिक शाळेपासुन घडलेला विद्यार्थी विद्यपीठात नावलौकीक करू शकतो़ मुलांना पालकांबरोबरच घडविण्याची खरी जबाबदार असेल तर ती फक्त प्राथमिक शिक्षकांची आहे़ नौकरी समजून मुलांना शिक्षण न देता राष्ट्रीय कार्य समजुन ज्ञान दानाचे कार्य करावे असे मत कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ पी़ पी़ पाटील यांनी व्यक्त केले़
शहरातील जोधराम रामलाल सिटी हायस्कूल येथे आयोजीत नाकरण सोहळ्यात इंग्लिश मेडियम व कनिष्ठ महाविद्यालयाचे नामकरण करण्यात आले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रवि बेलपाठक होते़ आळंदी येथील सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प़पू़ह.भ.प़ संदीपान महाराज, हासेगांवकर, कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ पी़ पी़ पाटील यांच्या हस्ते नामकरण करण्यात आले़ कार्यक्रमात प्रमुख पाहूणे सोनगीर आनंदवन संस्थेचे प़ पू़ डॉ़ मुकंदराव महारा, भालेबाबा दरबारचे प़ पू़ वाल्मिकदादा बोडके उपस्थित होते़
कुलगुरू पाटील म्हणाले की, अनेक शैक्षणिक संस्था निर्माण झाल्या आहेत़ त्यामुळे मुलांना शिक्षणासोबतच मुलभुत सुविधा मिळत नसल्याने त्यांची गुणवत्ता वाढ होत नाही़ पालकांनी मुलांच्या मुलांच्या आवडीनुसार शिक्षण देण्याची गरज आहे़ प्राथमिक शिक्षण हा मुलाचा खरा पाया असतो, पाया मजबुत असेल तर इमारत उभी राहू शकते त्यामुळे संक्षम इमारत उभी करण्याची जबाबदारी ही प्राथमिक शिक्षकांची असते, त्यासाठी ज्ञानदाचा कार्यात प्राथमिक शिक्षकांनी योगदान देण्याची गरज असल्याचे मत कुलगुरू पाटील यांनी व्यक्त केले़ कार्यक्रमात गुलाबचंद आगीवाल, लता आगीवाल, किशोर बारी, रेखा बारी देणगीदारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला़ कार्यक्रमात परिचय स्मिता देवरे, पंकज चौधरी यांनी केला तर सुत्रसंचालन संजय पाटील, प्रास्ताविक संतोषकुमार अग्रवाल, आभार आऱआर पेटारे यांनी मानले होते़