तापमानाचा पारा  ८.२ अंशावर घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:20 PM2018-12-14T22:20:58+5:302018-12-14T22:21:26+5:30

हुडहुडी : हंगामातील सर्वात कमी तापमान 

Temperature dropped to 8.2 degrees | तापमानाचा पारा  ८.२ अंशावर घसरला

dhule

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील तापमानात मोठी घट झाली असून शुक्रवारी सकाळी या हंगामातील सर्वात कमी ८.२ अंश तापमानाची नोंद झाली. चार दिवसांपूर्वी ९.४ तापमानाची नोंद झाली होती, असे सूत्रांनी सांगितले. 
गेल्या १०-१२ दिवसांपासून तापमानात घट होत असल्याने शहर परिसरात रात्री ऊब मिळविण्यासाठी शेकोट्या पेटविल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर आता महापौर कोण, स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागणार, अशा शिळोप्याच्या गप्पा या शेकोट्यांभोवती रंगत आहेत. 
थंडीमुळे उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी शहरातील तिबेटी बांधवांच्या दुकानांसह अन्य दुकानांवर गर्दी होत आहे. सकाळी शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांची पालकांकडून विशेष काळजी घेण्यात येत असल्याचे चित्र आहे. स्वेटर, कानटोपी, मफलर, कोट यांना मागणी वाढली आहे. 
रब्बी पिकांना फायदा दरम्यान घटत्या तापमानामुळे वाढणाºया थंडीचा फायदा रब्बी पिकांना होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यंदा पावसाअभावी रब्बी पिकांची लागवड घटली असली तरी थंडीमुळे त्यात वाढीची अपेक्षा आहे. 

Web Title: Temperature dropped to 8.2 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे