तापमानाचा पारा ४२ अंशावर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 05:13 PM2019-04-12T17:13:45+5:302019-04-12T17:14:50+5:30

धुळेकर हैराण : दुपारी शांतता, सायंकाळी वाढली रस्त्यावर गर्दी

Temperature humidity settles at 42 degrees | तापमानाचा पारा ४२ अंशावर स्थिर

dhule

googlenewsNext

धुळे : तापमानाचा पारा चांगलाच वाढत असल्याने दुपारी वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत़ बुधवारी ४१ अंश असलेले तापमान गुरुवारी ४२ अंश होते़ त्यामुळे धुळेकर नागरीक चांगलेच त्रस्त झाले आहेत़ दुपारच्या वेळेस घरातच थांबणे पसंत करत असल्यामुळे साहजिकच रस्त्यावर त्याचा परिणाम झालेला आहे़
टोपी-रुमालला मागणी
उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी टोप्या, उपरणे, बागायती रुमाल, गॉगल्सचा वापर वाढला आहे़ घराबाहेर निघणे अशक्य झाले आहे़ बहुतांश जणांकडे बागायती मोठ्या आकाराचे रुमाल दिसू लागले आहेत़
दुपारी रस्त्यावर शांतता
उन्हाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दुपारी त्यात अधिक भर पडत आहे़ परिणामी धुळेकर नागरीक शक्यतोअर घराबाहेर दुपारी निघत नसल्याने रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत़
सायंकाळी वाढली गर्दी
सकाळपासून जाणवणाऱ्या उन्हामुळे धुळेकर हैराण होत असताना सायंकाळच्या वेळेस रस्त्यावर गर्दी वाढलेली दिसत आहे़ शहरात सर्वदूर हेच चित्र पहावयास मिळत आहे़

Web Title: Temperature humidity settles at 42 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे