धुळे येथे भाजी बाजाराची इमारत पाडण्यावरून तणाव

By admin | Published: April 7, 2017 04:21 PM2017-04-07T16:21:01+5:302017-04-07T16:21:01+5:30

भाजी बाजाराच्या इमारतीची मुदत संपली असून ती पाडण्यासाठी महापालिकेचे जेसीबी आणण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला़

Tension on vegetable market building in Dhule | धुळे येथे भाजी बाजाराची इमारत पाडण्यावरून तणाव

धुळे येथे भाजी बाजाराची इमारत पाडण्यावरून तणाव

Next

धुळे, दि. 7-  शहरातील पाचकंदिल भागात असलेले भाजी बाजाराच्या इमारतीची मुदत संपली असून ती पाडण्यासाठी महापालिकेचे जेसीबी आणण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला़  या भागात तणावाची स्थिती होऊन व्यापा:यांचे शिष्टमंडळ महापालिकेत दाखल झाले.  दरम्यान, पाडण्याची कारवाई करण्यापूर्वी पाचकंदिल भागाचे चारही रस्ते बंद करण्यात आलेले आहेत़
शहरातील पाचकंदिल भागात असलेले लालबहादूर शास्त्री मार्केटच्या गाळ्यांची, ओटय़ांची मुदत संपुष्टात आलेली आह़े त्याठिकाणी नवीन मार्केटची रचना करण्यात येणार असल्यामुळे मार्केट पाडण्याच्या हालचालींना शुक्रवारी दुपारी अचानक वेग आला़ घटनास्थळी जेसीबी मशिन आणि पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आल्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होत़े
कोणत्याही प्रकारची नोटीस न देता अचानक कारवाई होत असल्याबद्दल येथील व्यापा:यांनी कारवाईला विरोध दर्शविला व व्यापा:यांचे शिष्टमंडळ आयुक्तांशी बोलण्यासाठी महापालिकेत दाखल झाले होत़े  मात्र आयुक्तांची भेट होऊ शकली नाही़ याठिकाणी सुध्दा पोलिसांचा बंदोबस्त कायम होता़
 कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त कायम आह़े

Web Title: Tension on vegetable market building in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.