‘जीएसटी’मुळे ठेकेदारांची निविदांकडे पाठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:06 AM2017-08-04T01:06:19+5:302017-08-04T01:09:43+5:30
धुळे : महापालिकेला एकाच कामासाठी वारंवार निविदा काढाव्या लागत असून त्यामुळे मोठे नुकसान होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेला एकाच कामासाठी वारंवार निविदा काढाव्या लागत असून त्यामुळे मोठे नुकसान होत आहे़ जीएसटीमुळे ठेकेदार निविदांकडे पाठ फिरवित असल्याने त्यांना मार्गदर्शन करण्यात यावे, अशी मागणी मनपा सदस्यांनी स्थायी समितीच्या सभेत केली़ सर्व विषय सभेत मंजूर करण्यात आले़
महापालिका स्थायी समितीची सभा गुरुवारी पार पडली़ या सभेला सभापती कैलास चौधरी, आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त रवींद्र जाधव यांच्यासह सर्व सदस्य व अधिकारी वर्ग उपस्थित होता़ सभेत नगरसेवक संजय गुजराथी यांनी जीएसटीबाबत विचारणा केली़ जीएसटीची आकारणी कशी होत आहे़, बिलांवर जीएसटी का आकारला जात आहे? यांसारखे प्रश्न त्यांनी उपस्थित केले़ त्याचप्रमाणे मनपाला एकाच कामासाठी वारंवार निविदा काढाव्या लागत असून त्यावर मोठा खर्च करावा लागत आहे़ मात्र जीएसटीमुळे फटका बसत असल्याने ठेकेदार निविदा भरत नाही, असे ते म्हणाले़ त्यावर खुलासा करतांना आयुक्त सुधाकर देशमुख यांनी जीएसटी केवळ मनपातच नव्हे तर सर्व शासकीय योजनांच्या सेवांवर आकारला जात असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले़ नगरसेवक ईस्माइल पठाण यांनी घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसवूनच करसंकलनास सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी केली़ साबीर सैयद यांनी घरकूल योजना, गढूळ पाण्याची समस्या, करवसुलीत होणारा गोंधळ, ४ कोटी रुपयांच्या विशेष रस्ता अनुदानाची फाईल गहाळ झाल्याच्या प्रश्नांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले़ त्याचप्रमाणे सर्व बाजूने मनपाची आर्थिक लूट सुरू असताना प्रशासनाचे नियंत्रण आहे किंवा नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला़ त्यावर विषयनिहाय खुलासा आयुक्त देशमुख यांनी केला़ त्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले़ गुरूवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतदेखील जीएसटीवरून ओरड झाली होती़
स्थायीतील चर्चित मुद्दे़़़
बांधकाम प्रक्रियेमुळे सध्या गोंधळ होत असला तरी लवकरच आॅनलाईन होणार आहे़
घरकुल योजना दोन टप्प्यात राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यातील योजनेच्या अहवालात काम पूर्ण झाल्याचे व दुसºया टप्प्यातील योजनेच्या अहवाल काम अपूर्ण असल्याचे नमुद आहे़
नगररचना विभागात बांधकामांचे ‘प्लॅन’ मंजुरीसाठी आले असता प्लॅन वेगळाच मंजूर होतो व प्रत्यक्षात बांधकाम मात्र वेगळेच होते, असा आरोप साबीर सैयद यांनी केला़
स्थायी समितीच्या सभेत विषयपत्रिकेवरील विषयांव्यतिरिक्त प्रश्नोत्तरे करू नये, असे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सभेत स्पष्ट केले़