धुळ्यातील श्रीराम पेट्रोल पंपाची ठाणे पोलिसांकडून तपासणी
By admin | Published: July 1, 2017 03:51 PM2017-07-01T15:51:47+5:302017-07-01T15:51:47+5:30
श्रीराम पेट्रोलपंपाची शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ठाणे गुन्हे शाखेकडून तपासणीला सुरुवात झाली आह़े
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.1 - शहरातील श्रीराम पेट्रोलपंपाची शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ठाणे गुन्हे शाखेकडून तपासणीला सुरुवात झाली आह़े तपासणी गोपनीय असल्याचे सांगत तपासणीचा अहवाल वरिष्ठांना कळविण्यात येणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आल़े
पेट्रोल पंपावर सेटींग करुन अधिक पैसे लुटण्याचा प्रकार आता सुरु झाला आह़े हा प्रकार संपूर्ण राज्यातील विविध पेट्रोलपंपावर सुरु असल्याने दक्षता पाळली जात आह़े चाळीसगाव क्रॉसींगवरील पेट्रोल पंपाची तपासणी करण्यासाठी ठाणे गुन्हा शाखेचे पथक, ऑईल कंपनीचे पथक आणि तांत्रिक काम पाहणारे पथक असे प्रत्येकी 5 जण असे एकूण 15 अधिकारी व कर्मचारी धुळ्यात दाखल झाल़े स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेवून सकाळी 9 वाजता तपासणीच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आह़े
या पेट्रोल पंपावर 3 मशीन असून 10 नोजल आहेत़ यापैकी एका ठिकाणी दोष आढळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आह़े पण नेमका कोणता दोष याबाबत अधिका:यांनी सांगण्यात असमर्थता दर्शविली़ तपासणीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल़ त्यानंतरच पुढील कारवाईचे स्वरुप स्पष्ट होणार असल्याचे पोलीस अधिका:यांकडून सांगण्यात आल़े तपासणी असल्यामुळे पेट्रोल पंप तात्पुरता बंद ठेवण्यात आला असून त्याचीच चर्चा सुरु आह़े