चारित्र्याच्या संशयावरून मुलाने केली आईसह आजीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 09:59 AM2022-05-26T09:59:16+5:302022-05-26T09:59:51+5:30

चंद्रभागाबाई भावराव माळी (६५) आणि  वंदनाबाई गुणवंत महाले (४५) अशी मृतांची नावे आहेत. 

The boy murdered his mother and grandmother on suspicion of adultery | चारित्र्याच्या संशयावरून मुलाने केली आईसह आजीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून मुलाने केली आईसह आजीची हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आईच्या चारित्र्यावर संशय घेत १९ वर्षाच्या मुलाने ४५ वर्षीय  आईसह ६५ वर्षांच्या आजीच्या डोक्यात लोखंडी पाईपने प्रहार करून दोघींचाही खून केला. ही घटना सोमवारी पहाटे घडली. पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत आरोपी हितेश महाले (१९, रा. आडगाव, ता. एरंडोल) याला अटक केली असून, त्याने खुनाची कबुली दिली आहे. 

चंद्रभागाबाई भावराव माळी (६५) आणि  वंदनाबाई गुणवंत महाले (४५) अशी मृतांची नावे आहेत. मृत वंदनाबाईचे आडगाव हे सासर असून, घरगुती वादातून त्या गेल्या काही महिन्यांपासून आपल्या आईकडे तरवाडे  (ता. धुळे) येथे राहात होत्या. दोघी रस्त्यालगत चहाची टपरी चालवून आपली उपजीविका चालवत होत्या. वंदनाबाईचा मुलगा हितेश याला आईच्या चारित्र्यावर संशय होता.  त्यातूनच त्याने दोघींचा खून केला. 

Web Title: The boy murdered his mother and grandmother on suspicion of adultery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.