राज्यात हुडहुडी, महाबळेश्वरनंतर सर्वात नीचांकी तापमान धुळे जिल्ह्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 09:36 AM2022-11-20T09:36:14+5:302022-11-20T09:37:00+5:30
राज्यात एकीकडे नाशिक, महाबळेश्वर येथील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्यानंतर सर्वात नीचांकी तापमानाची नोंद धुळे जिल्ह्यात झाली आहे.
धुळे : एकीकडे राज्यात सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलेले असताना दुसरीकडे मात्र राज्यात वाढलेल्या थंडीने नागरिकांमध्ये चांगलीच हुडहुडी भरली आहे. या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडत असून धुळे शहराच्या विविध भागात नागरिकांची व्यायामासाठी गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
धुळ्यात 7 अंश सेल्सिअस वर धुळे शहरासह जिल्ह्याचे तापमान येऊन पोहोचलेले आहे. सध्याच्या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली आहे. या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. वाढत्या थंडीचा फायदा रब्बी हंगामाच्या पिकांना देखील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात एकीकडे नाशिक, महाबळेश्वर येथील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्यानंतर सर्वात नीचांकी तापमानाची नोंद धुळे जिल्ह्यात झाली आहे. आज धुळे जिल्ह्यात 7 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले असून हे सर्वात नीचांकित तापमान असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे थंडीची हुडहुडी मोठ्या प्रमाणावर वाढली असून या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडत आहेत, मात्र थंडीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडताना नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर करावा, असे आवाहन डॉक्टरांच्यावतीने करण्यात येत आहे.
धुळे शहराच्या विविध भागात नागरिकांची सकाळीच गर्दी होत असल्याचे दिसून येत असून जिल्हा क्रीडा संकुलात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ही थंडी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असून तसेच या थंडीचा फायदा रब्बी पिकांना देखील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना आता रब्बी हंगामातील ही थंडी पिकांसाठी उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे.