जिल्हाभरात पावसाची रिपरिप सुरूच
By admin | Published: September 21, 2015 12:26 AM2015-09-21T00:26:13+5:302015-09-21T00:26:13+5:30
नंदुरबार : जिल्हाभरात सलग चौथ्या दिवशी पावसाची रिपरिप सुरू होती.
नंदुरबार : जिल्हाभरात सलग चौथ्या दिवशी पावसाची रिपरिप सुरू होती. काही भागात मध्यम तर काही भागात तुरळक स्वरूपात पाऊस झाला. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. महिनाभरानंतर पावसाचे पुनरागमन झाल्याने आनंद व्यक्त करण्यात आला. चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्याचा परिणाम नदी, नाले प्रवाहित झाले आहेत. परिणामी जिल्ह्यातील 37 लघु व चार मध्यम प्रकल्पांमध्ये ब:यापैकी पाणीसाठा झाला आहे. गेल्या आठवडय़ात जिल्ह्यातील प्रकल्पांमधील सरासरी पाणीसाठा अवघा 27 टक्के होता. या पावसानंतर पाणीसाठा 50 टक्केपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. काही भागात भिजपाऊस झाला, तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तळोदा तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. तर नंदुरबार, शहादा तालुक्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस सुरू होता.