शिक्षण क्षेत्रात मराठीची सक्ती असलीच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:06 PM2019-06-12T12:06:23+5:302019-06-12T12:07:03+5:30

अनिल सोनार : मराठीला कोणताही पर्याय नाही

There must be compulsion for Marathi in the field of education | शिक्षण क्षेत्रात मराठीची सक्ती असलीच पाहिजे

dhule

Next

धुळे : राज्यात सर्वस्तरासह शिक्षण क्षेत्रात मराठीची सक्ती असली पाहिजे. आपल्या सख्या आईवर प्रेम करायची सक्ती करायला सांगण्याजोगी ही अत्यंत दुर्देवी, मराठी मनास लज्जास्पद असणारी बाब आहे़ पण, आज ते कटू वास्तव आहे़ मराठी भाषेला पर्याय असूच शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रसिध्द नाटककार प्रा़ अनिल सोनार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़ 
प्रा़ सोनार यांनी सांगितले, भाषेचा संबंध उपजिवीकेशी जोडल्यामुळे पर्याय घेताना मराठी भाषा डावलण्यापलिकडे मराठी मातृभाषिकांचा कल असतो़ उपजिवीकेचे साधन या पलिकडे जावून फार मोठे महत्वाचे कार्य कळत-नकळत प्रत्येकाची मातृभाषा करत असते़ सुदैवाने मराठीतील साहित्य विशेषत: संत साहित्य हे अतिशय श्रीमंत आहे़ मातृभाषेचे ऐश्वर्य कळण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने चांगल्या मराठी ललित साहित्याचे सतत वाचन करायला हवे़ मराठी भाषिकांनी आपल्या मातृभाषेबद्दलचे खोटे कड काढणे आता थांबवायला हवे़ 
गेल्या दहा वर्षात एका पाठोपाठ एक बंद पडत असलेली वाचनालय ही जणू आपण आपल्याच भाषेसंदर्भात किती बेजबाबदार आहोत याचा पुरावा आहे़ महाराष्ट्र सोडल्यास प्रत्येक राज्यात तिथल्या राजभाषेची इथली राजभाषा हा शिकण्याचा सक्तीचा विषय आहे़ केरळ, कर्नाटकसारख्या राज्यातील त्या त्या भाषांची स्वतंत्र्य भाषा भवने आहेत़ महाराष्ट्रात भाषेचे भवन अजूनही नाही़ 
उपजिवीकेसाठी जगातील कुठलीही भाषा शिकावी़ पण, स्वाभिमानाने संपन्न जीवन जगण्यासाठी मातृभाषेवर प्रभुत्व असणे अत्यावश्यक आहे़ मराठीच्या अस्मितेच्या कंठाळी गर्जना करणे आता थांबवायला हवे़ महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत फक्त ३० टक्के मराठी मातृभाषिक उरले आहेत़ ते ही व्यवहारात हिंदी, इंग्रजी इत्यादी भाषांचा उपयोग करतात़ 
वाचनालयांची बंद पडलेली अनुदाने शासनाने सुरु करायला हवीत़ मराठीत विशेष प्राविण्य मिळविणाºया कर्मचाºयांचा सुयोग्य सन्मान करायला हवा़ या राज्याचे सरकार आणि मराठी नागरिक हे आत्ताच जागे झाले पाहीजे़ नाही तर शंभर वर्षानंतर मराठी भाषा इतिहास जमा व्हायला वेळ लागणार नाही़ आपण हे असे घडणार नाही याची दक्षता घ्यायला हवी़ 

*मराठीच्या मुद्यावर मतांचे राजकारण करणाºयांना मराठी ऐवजी धर्माची कास धरणे आणि सत्तेत टिकून राहणे हा मार्ग जवळचा वाटतो़ पण, प्रत्येक सुजाण मराठी मातृभाषिकाने मराठी भाषेच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी कटिबध्द असावे.
- प्रा़ अनिल सोनार, धुळे

Web Title: There must be compulsion for Marathi in the field of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे