आधुनिक औषधांशिवाय पर्याय नाही - धुळ्यातील चर्चासत्रातील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 05:48 PM2018-04-22T17:48:07+5:302018-04-22T17:48:07+5:30

राज्यस्तरीय : आयएमए व अंनिसतर्फे आयोजन, बुवाबाजीला विरोध

There is no alternative without modern medicines - | आधुनिक औषधांशिवाय पर्याय नाही - धुळ्यातील चर्चासत्रातील सूर

आधुनिक औषधांशिवाय पर्याय नाही - धुळ्यातील चर्चासत्रातील सूर

Next
ठळक मुद्देधुळ्यात राज्यस्तरीय चर्चासत्रआयएमए आणि अंनिसचा पुढाकारबुवाबाजीवर कडाडून टिका

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दिवसेंदिवस बुवाबाजीचे प्रकार वाढत आहे़ त्याला कडाडून विरोध करण्यासाठी अंधश्रध्दा निर्मुलन समिती पुढे सरसावली असताना आयएमएने देखील पुढाकार घेतला आहे़ वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक उपचार पध्दती आणि औषधांमुळे रुग्णांना निश्चित फायदा होत आहे़ भोळ्या लोकांना लुबाडण्याचा प्रकार थांबवायला हवा असा सूर अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या राज्यस्तरीय चर्चासत्रातून रविवारी निघाला़  
इंडियन मेडिकल असोसिएशन व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आयएमए सभागृहात ‘वैद्यकीय क्षेत्रातील फसव्या उपचार पद्धती व शोषण विरोधी भूमिका’ या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र पार पडले़ यावेळी आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ़ रवी वानखेडकर, आयएमए धुळेचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप पाटील, डॉ रवींद्रनाथ टोणगावकर, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अ‍ॅड़ जे. टी. देसले, डॉ़ सुरेश वसईकर, डॉ़ सुरेश बिºहाडे, सुरेश थोरात, प्रा़ दीपक बाविस्कर आदी उपस्थित होते़ 
डॉ़ वानखेडकर म्हणाले, भारतीय चिकित्सा पध्दतीला विरोध नाही़ शास्त्रीय ज्ञानाप्रमाणे त्याचा अंमल झाला पाहीजे़ आजच्या स्थितीत तावून सलाखून डॉक्टर होत असताना दुसरीकडे मात्र अल्पावधीचे कोर्स घेऊन डॉक्टर तयार होत असल्याचा धोकाही त्यांनी दर्शविला़ आरोग्याचे राष्ट्रीयकरण झाले पाहीजे़ शासनाने ही आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी स्विकारण्याची आवश्यकता आहे़ 
डॉ़ टोणगावकर म्हणाले, आजच्या स्थितीत फसवे विज्ञान वाढत असताना ते रोखण्याची जबाबदारी स्विकारण्याची गरज आहे़ अंधश्रध्दा फोफावत असल्याने परिणामी ग्रामीण भागात मृत्यू दराची संख्या वाढत आहे़ ते रोखण्यासाठी आधुनिक उपचार पध्दती अंगिकारायल हवी़ ताणतणाव वाढत असल्याने आजाराचे प्रमाण वाढत आहे़ मन आणि आजार यांचा जवळचा संबंध आहे़ त्यामुळे सकारात्मकता बाळगावी आणि अंधश्रध्देपासून दूर रहावे असा सल्लाही त्यांनी दिला़ 
अविनाश पाटील यांनी वाढत असलेल्या अंधश्रध्देवर कडाडून टिका केली़ राज्यात अनेक ठिकाणी जावून चुकीचा प्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे़ काही ठिकाणी पोलिसात तक्रारी देखील दाखल केल्या आहेत़ अंधश्रध्दा निर्मुलन करण्यासाठी जिल्हावार चर्चासत्र घेत असताना आता विभागीय पातळीवर घेण्याचे नियोजन आखण्यात येईल़ शिक्षणाप्रमाणे आरोग्याचे खासगीकरण होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली़ 
चर्चासत्राचे सुत्रसंचालन दिनेश मोरे यांनी तर प्रास्ताविक डॉ़ सुरेश वसईकर यांनी केले़ चर्चासत्राला मान्यवर उपस्थित होते़ 

Web Title: There is no alternative without modern medicines -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे